Dailyhunt
ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।

हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख अखेर ठरली आहे. २ मे रोजी बारावी बोर्डाचा निकाल लागणार आहे.

सकाळी ११ वाजता राज्य मंडळाकडून निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजेपासून मंडळाच्या साईटवर निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी ते मार्च २०२६ मध्ये १२ च्या परिक्षा घेण्यात आली होती.

मंडळाच्या एकूण पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागांमध्ये ही परीक्षा पार पडली. या परिक्षेला १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

अखेरीस आता २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी राज्य मंडळाकडून पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता नेहमी प्रमाणे मंडळाच्या साईटवर निकाल पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल कुठे पाहायचा?

बारावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र बोर्डासह इतरही काही वेबसाइटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. तुम्ही निकाल पाहण्यासाठी पुढील वेबसाइटचा वापर करू शकता.

https://mahahsscboard.in

https://hscresult.mkcl.org

https://results.digilocker.gov.in

किती विद्यार्थी बसले होते परिक्षेला?

यंदा बारावीच्या परिक्षेला १५ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यामध्ये मुलं ८,२०,२२९ आणि ७,१२,२४० इतकी मुलींची संख्या आहे. तर १८ तृतीयपंथीयांनी परिक्षा दिली.

शाखेनुसार पाहिलं तर विज्ञान शाखेसाठी ७,९९,७७३, कला ३,८०,६९२ आणि वाणिज्य ३,२०,१५२ विद्यार्थी बसले होते.

तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २७,३७८, आयटीआय ४,४९२ विद्यार्थ्यांची संख्या आहे. यंदा सगळ्यात जास्त विद्यार्थी हे मुंबई विभागातून ३,५२,७१८ इतके बसले होते. सगळ्यात कमी विद्यार्थी हे कोकण विभागीय मंडळातून २४,०१३ इतके विद्यार्थी बसले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times