Wednesday, 05 Aug, 9.49 am मंगळवेढा Times

होम
पाऊस समाधानकारक झाल्याने एकरी टनेज वाढणार : चेअरमन समाधान आवताडे

गळीत हंगाम २०२०-२१ करिता ऊस तोडणी वाहतुक ऍडव्हान्स चेक वितरण

टीम मंगळवेढा टाईम्स । यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व ऊसाचे वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने एकरी टनेजमध्ये चांगलीच वाढ होणार असल्याचे प्रतिपादन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी केले आहे. ते गळीत हंगाम २०२०-२१ करिता ऍडव्हान्स चेक वितरण प्रसंगी बोलत होते. Satisfactory rainfall will increase acreage: Chairman Satisfaction Avatadeऊसाच्या लागणीही मोठया प्रमाणात होत आहेत.येणाऱ्या हंगामात कारखान्याचे गळीतासाठी ऊस तोड वाहतुक यंत्रणेची पुरेशा प्रमाणात भरती करुन त्यांना ऍडव्हान्स वाटप केलेने दैनंदिन ३७०० ते ४००० मे.टन प्रमाणे गाळप होईल.संचालक मंडळाचे सहकार्याने यावर्षीचे हंगामात ५।५० ते ६।०० लाख मे।टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असुन सर्व ऊस उत्पादक सभासद बंधुभगिनीनी दामाजी कारखान्याचे गळीतास ऊस पाठवुन सहकार्य करावे असे अवाहन त्यांनी सदर प्रसंगी केले.

श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२०-२१ करिता कारखान्याने २५० ट्रक/ट्रॅक्टर (मजुर टोळीसह), हार्वेस्टर मशिन, ७०० बैलगाडी, १५० डंपींग ट्रॅक्टर अशा प्रकारे सुसज्ज ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेची भरती केली आहे.

ट्रक/ट्रॅक्टर ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांना प्रत्येकी २ लाख प्रमाणे, बैलगाडी ठेकेदार यांना ३०००० प्रमाणे ऍडव्हान्स चेकचे वितरण कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे शुभहस्ते केले.तसेच कारखान्यामार्फत सभासदांचा जनता अपघात विमा युनायटेड इंडिया इन्यशुरन्स कंपनी यांचेकडुन घेतला असुन अपघाताने मृत्यु पावलेले कारखान्याचे सभासद गणपत बनसोडे यांच्या वारसपत्नी सरुबाई बनसोडे यांना नुकसान भरपाई चेक समाधान आवताडे यांचे हस्ते देण्यात आला.

कारखान्यातील मशिनरी दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असुन १५ सप्टेंबर २०२० पर्यंत कारखाना गाळपासाठी तयार होणार असलेची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुहास शिनगारे यांनी दिली.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक बापु काकेकर, बाळासो शिंदे, संजय पवार, यांचेसह भारत निकम, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार श्री।सुनिल जाधव, अर्जुन घोडके, रावसाहेब बागल, मच्छिंद्र मुंगसे,दामाजी बंडगर, तानाजी नागटिळक,नारायण सानप,दिनकर बडे, शंकर गोल्हार, शेती अधिकारी रमेश पवार चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times
Top