Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

टीम ​मंगळवेढाटाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र, सभापती दीपाली आनंद ताड यांनी या समस्येची गंभीर दखल घेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर तालुक्यातील ७ शाळांना नवीन शिक्षक मिळाले आहेत.

या धडाडीच्या निर्णयामुळे संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील पालक वर्गातून प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​'या' शाळांमध्ये झाली शिक्षक नेमणूक

​सभापती दीपाली ताड यांच्या सूचनेनंतर तालुक्यातील खालील जिल्हा परिषद शाळांमध्ये तात्काळ शिक्षक नेमणूक करण्यात आली आहे:
​डोंगरगाव, मोरेवाडी, ​हिवरगाव, ​ढवळस, ​मारोळी,​हुलजंती व ​सिद्धापूर

​पालकांच्या तक्रारीची तात्काळ दखल

​काही दिवसांपूर्वी डोंगरगाव येथील मोरेवाडी शाळेतील पालकांनी उद्योजक दत्तात्रय भुसे यांच्या उपस्थितीत सभापती दीपाली ताड यांची भेट घेतली होती.

शाळेत शिक्षक कमी असल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर होणाऱ्या परिणामांबाबत पालकांनी तीव्र खंत व्यक्त केली होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सभापती ताड यांनी तात्काळ प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या.

​प्रशासनाकडून गतीने कार्यवाही

​सभापती दीपाली ताड यांनी दिलेल्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी योगेश कांबळे व गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता यांनी तातडीने पावले उचलली. प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ शिक्षकांच्या नेमणुकांचे आदेश जारी केले.

​"ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे. पालकांनी समस्या मांडताच आम्ही प्रशासनाच्या मदतीने ती सोडवली आहे. तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधा उपलब्ध करणार"
- दीपाली आनंद ताड (सभापती)

​सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव

​शिक्षकांची कमतरता दूर झाल्याने शाळांचा रखडलेला अभ्यासक्रम आता वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. सभापती दीपाली ताड यांनी दाखवलेली तत्परता आणि त्याला मिळालेले यश याबद्दल मोरेवाडीसह सर्वच गावांतील ग्रामस्थांनी व पालकांनी त्यांचे विशेष आभार मानले असून, तालुक्यात त्यांच्या या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times