Dailyhunt
शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

मंगळवेढा टाईम्स न्युज।

'प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचे बियाणे मोफत व अनुदानावर देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना स्वतः शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

जो शेतकरी अगोदर अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्याने बियाणे मिळणार आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, तूर आदी पिके घेतली जातात. एकरी उत्पादन वाढीच्या उद्देशाने शासनाकडून मोफत व अनुदान स्वरूपात दरवर्षी बियाणे वाटप करण्यात येते.

खरीप २०२६-२७ या हंगामाकरिता अन्नधान्य पिके, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान व तेलबिया अंतर्गत पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी शेतकरी गटांनी बियांणासाठी अर्ज करायचे आहेत.

शासन धोरणानुसार पात्र शेतकरी गट व वैयक्तिक शेतकरी बियाणासाठी महाडीबीटीवर शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. अगोदर अर्ज करतील त्यांना प्राधान्यक्रमाने बियाणे मंजूर व वाटप केले जाते.

काही योजनेतून मोफत तर काही योजनेतून अनुदानावर बियाणे वितरण केले जाते.- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

तूर, मूग, उडीद पीक पद्धत सोयाबीन, बाजरी, मका या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पीक प्रात्यक्षिकांचा व प्रमाणित बियाणे वितरण घटकांचा कार्यक्रम राबविला जातो.

शेतकरी गटांना अर्ज करता येतील

मार्च २०१८ व त्या अगोदर नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास पात्र आहेत. गटाची निवड प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे.

महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर 'प्रात्यक्षिक, औषधे आणि खाते' या अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. बियाणे वितरण घटकासाठी वैयक्तिक अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येतील. मोफत व अनुदानावर बियाणांची सवलत घेणाऱ्यांचे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

अर्जात फार्मर आयडी नमूद करणे आवश्यक आहे. पीक प्रात्यक्षिक १०० टक्के अनुदान बियाणे (तूर, मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, मका), प्रमाणित बियाणे (सुधारित बियाणे- १० वर्षांच्या आतील प्रति क्विंटल पाच हजार,

१० वर्षांवरील बियाणासाठी प्रति क्विंटल अडीच हजार, तूर, मूग, उडीद) मागील वर्षी पाच हजार ४८९ शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वितरण, १० हजार ४४० शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिक (कडधान्य)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times