Tuesday, 04 Aug, 6.57 pm मंगळवेढा Times

होम
सोलापूरकरांना दिलासा! आज एकाचाही मृत्यू नाही,44 नवे कोरोनाबाधित आढळले

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोनाचा धोका कमी होत चालला असल्याचे आजचे आलेल्या अहवालावरून समजते.आज शहरातील 287 पैकी 44 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आता शहरातील एकूण रुग्णसंख्या 5 हजार 190 झाली आहे.

आज मुस्लिम पाच्छा पेठ, न्यू लक्ष्मी चाळ, राजीव गांधी नगर, ज्ञानेश्‍वर नगर (विजयपूर रोड), थोबडे वस्ती (देगाव नाका), समर्थ नगर, संतोष नगर (जुळे सोलापूर),नवीपेठ, मुस्लिम कब्रस्तानजवळ (सिध्देश्‍वर मंदिर परिसर), मजरेवाडी, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), हराळे नगर (कुमठा रोड), भवानी पेठ, विष्णू नगर (स्वागत नगराजवळ), रेवणसिध्देश्‍वर नगर, आंबेडकर नगर (होटगी रोड), कृष्णा वसाहत (विडी घरकूल), शिक्षक सोसायटी (दक्षिण सदर बझार), मुरारजी पेठ, झुरले नगर, सलगर वस्ती,


मौलाना चौक (नई जिंदगी), रविंद्र नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), प्रताप नगर (विजयपूर रोड), विजया हौसिंग सोसायटी (कुमठे), गंगाई केकडे नगर (मुळेगाव रोड), कोटा नगर (राघवेंद्र मंदिराजवळ), रंगराज नगर (जुना विडी घरकूल), मल्लिकार्जुन नगर (अक्‍कलकोट रोड) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times
Top