Monday, 11 Jan, 6.25 pm Marathi Tech

होम
Lava कंपनीचे नवे स्मार्टफोन्स सादर : आवडीनुसार पार्ट्स निवडण्याची सोय!

लावा (Lava) या भारतीय कंपनीने चार नवे स्मार्टफोन्स सादर केले असून हे सर्व फोन्स भारतातच तयार केले जाणार आहेत. आपल्या आवडीनुसार पार्ट्स निवडून स्मार्टफोन मागवता येणार असून हे फोन्स MyZ या मालिकेअंतर्गत मिळतील. ११ जानेवारीपासून lava च्या वेबसाइटवर हा पर्याय मिळेल. याद्वारे तुम्ही ६६ विविध पर्यायांचा वापर करून स्वतःसाठी फोन तयार करून मागवु शकाल! यामध्ये रॅम, रॉम, फ्रंट कॅमेरा आणि रियर कॅमेरासुद्धा कस्टमाईज करता येईल!

हे made to order फोन्स रॅमसाठी 2GB/3GB/4GB/6GB, स्टोरेजसाठी 32GB/64GB/128GB, कॅमेरासाठी 13MP+2MP/13MP+5MP+2MP, सेल्फीसाठी 8MP/16MP असे पर्याय उपलब्ध करून देणार आहेत! कल्पना चांगली असली तरी उपलब्ध पर्याय तितकेसे चांगले नाहीत असं सध्या तरी दिसून येत आहे.

Lava MyZ Link : https://www.lavamobiles.com/myz

Lava ने Z1, Z2, Z4, व Z6 हे चार फोन यावेळी आणले असून यांची किंमत अनुक्रमे ५४९९, ६९९९, ८९९९ व ९९९९ अशी असणार आहे.

Z1 : डिस्प्ले 5", प्रोसेसर MediaTek Helio A20, रॅम 2GB, स्टोरेज 16GB
Z2 : डिस्प्ले 6.5" HD+, प्रोसेसर MediaTek Helio G35 , रॅम 2GB, स्टोरेज 32GB, बॅटरी 5000mAh, कॅमेरा 13MP+2MP, फ्रंट कॅमेरा 8MP
Z4 : डिस्प्ले 6.5" HD+, प्रोसेसर MediaTek Helio G35 , रॅम 4GB, स्टोरेज 64GB, बॅटरी 5000mAh, कॅमेरा 13MP+5MP+2MP, फ्रंट कॅमेरा 16MP
Z6 : डिस्प्ले 6.5" HD+, प्रोसेसर MediaTek Helio G35 , रॅम 6GB, स्टोरेज 64GB, बॅटरी 5000mAh, कॅमेरा 13MP+5MP+2MP, फ्रंट कॅमेरा 16MP

हे फोन सध्या भारतीय कंपनीचे भारतीय फोन्स म्हणून मार्केट केले जात असले तरी खरेदी करत असताना त्यांची गुणवत्ता तपासून योग्य तो पर्याय निवडून मगच खरेदी करा. ज्यांना भारतातच तयार झालेला भारतीय कंपनीचा फोन घ्यायचा आहे त्यांना हे फोन्स, मायक्रोमॅक्सचे फोन्स असे पर्याय आता उपलब्ध होत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Marathi Tech
Top