होम
OnePlus चा आता फिटनेस बॅंड भारतात सादर !

वनप्लस या स्मार्टफोन कंपनीने आता त्यांचा फिटनेस बॅंड आणला असून यामध्ये १३ स्पोर्ट मोड, AMOLED डिस्प्ले, हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सरचा समावेश आहे. आता या क्षेत्रात स्वस्त बॅंडसाठी त्यांची शायोमी, रियलमी यांच्यासोबत स्पर्धा असेल. या OnePlus Band बॅंडची किंमत २४९९ आहे. १३ जानेवारीपासून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लसच्या दुकानांमध्ये उपलब्ध होईल.
या खास फिटनेससाठी आणलेल्या बॅंडमध्ये 1.1 इंची AMOLED कलर टचस्क्रीन डिस्प्ले असून त्याच रेजोल्यूशन 294×126 असं आहे. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी हार्ट रेट सेन्सर आणि ब्लड ऑक्सिजन मोजण्यासाठी SpO2 सेन्सर दिलेला आहे. Outdoor running, Outdoor cycling, Outdoor walking, Indoor Cycling, Indoor running, Fat loss running, Free training, Badminton, Cricket, Swimming, Yoga, Elliptical machine आणि weight training असे १३ स्पोर्ट मोड यामध्ये देण्यात आले आहेत.
याची बॅटरी लाईफ १४ दिवसांची असेल. IP68 water आणि dust-resistant असल्यामुळे पाण्यातही हा बॅंड वापरू शकता. OnePlus Health app द्वारे या बॅंडमधील माहिती फोनमध्ये पाहू शकाल. यासाठी यात Bluetooth 5.0 दिलेलं आहे. लवकरच वनप्लसचं स्मार्ट वॉचसुद्धा येईल अशी चर्चा आहे!
Fits your wrist, and your pocket.
- OnePlus India (@OnePlus_IN) January 11, 2021
Introducing the #OnePlusBand.
Get it at ₹2,499 on https://t.co/zMYReDQeSb, Amazon, Flipkart, OnePlus Exclusive stores and OnePlus Partner stores.#SmartEverywear
Sales start soon. pic.twitter.com/b8Q3RIOQX6
वनप्लस कंपनीने पुन्हा एकदा ओप्पोचच उत्पादन rebrand करून स्वतःच्या नावाने बाजारात आणलं आहे. शायोमी हे गेले कित्येक दिवस करत आली आहे. आता वनप्लससुद्धा त्याच वाटेवर आहे. BBK Electronics कडे विवो, ओप्पो आणि वनप्लस या तिघांची मालकी आहे. हे झाल्यापासून वनप्लसचे अलिकडचे जवळपास सर्वच फोन्स ओप्पोच्या कुठल्या तरी फोन सारखेच दिसून येत आहेत.
अनेक ग्राहकांनीही आता याबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून आत्ताची वनप्लस आधी सारखी राहिली नाही असं अनेकांचं मत दिसून येत आहे. वनप्लसचे फोन्ससुद्धा आता ओप्पोच्याच फॅक्टरीमध्ये तयार होतात.