Thursday, 21 Jan, 4.25 pm मराठवाडा साथी

होम
दाऊदच्या अड्ड्यावर NCB चा छापा.!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दाऊदच्या अड्ड्यावर एनसीबीने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.डोंगरी याठिकाणी टाकण्यात आलेल्या या छाप्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रगचा संपूर्ण कारखाना उध्वस्त करण्यात आला याचदरम्यान एनसीबीने केलेल्या या छापेमारीमध्ये काही प्रमाणात हत्यार सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.सोबतच कोट्यवधी रुपयांची रोखरक्कम देखील या छापेमारीमध्ये जप्त करण्यात आली आहे. एनसीबीच्या कारवायांपैकी ही एक महत्त्वाची कारवाई आहे.दरम्यान,चिंकू पठाणला एनसीबीने बुधवारी ताब्यात घेतले असून त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीमधून एनसीबीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान,अंमली विरोधी पथकाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक आहे. तसंच तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर मुंबई अंमली पदार्थ तस्कारांना मोठा हादरा बसला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Marathwada Sathi
Top