Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आरक्षणाच्या मुद्द्यावरून gen z मध्ये फूट पडण्याचा प्रयत्न?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून gen z मध्ये फूट पडण्याचा प्रयत्न?

Max Maharashtra 3 weeks ago

इंस्टाग्राम या समाज माध्यमात तयार झालेला अभिजित दिपकेचा कॉक्रोक जनता पार्टी हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. CJP ने केलेल्या आंदोलनात देशातील सर्व समाज घटकातील तरुणाई एकोप्याने सहभागी झालेली दिसली.

अभिजित दीपके या दलित जातीत जन्मलेल्या तरुणाच्या नेतृत्वाला मोठ्या प्रमाणात सवर्ण जात समूहातील तरुणांनी प्रतिसाद देणे ही मुळात या देशातील एक क्रांतिकारी घटना आहे. हे आंदोलन सुरू असताना यातील तरुणांची एकजूट मोडून काढण्यासाठी, तरुणांत जातींच्या आधारे फूट पडण्यासाठी आरक्षणाचा विषय पुढे करण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे तरुण काय त्याला अघ्याप बळी पडले नाहीत.

CJP प्रमाणेच "रिझर्वेशन हटाव आंदोलन" नावाने इंस्टाग्राम वर हॅण्डल तयार करण्यात आलं आहे. CJP चे हॅण्डल अभिजित दीपके ने सुरू केले होते. त्याने सुरुवातीपासून आंदोलनाच्या शेवटापर्यंत त्याची जबाबदारी घेतली व नेतृत्व केले. या "रीझर्वेशन हटाव" च्या हँडलची मात्र आघ्याप कुणी जबाबदारी घेत पुढे यायला तयार नाही. मेरठ येथील RSS स्वयंसेवक नीरज त्यागी यांचा मुलगा असलेला देवांश त्यागी याने हे हॅण्डल तयार केले होते. परंतु आता त्याने यापासुन स्वतः ला वेगळे करत इतरांवर या हँडलची जबाबदारी सोपवत असल्याचे सांगून पळ काढला आहे. माध्यमातून या RHA ची मोठ्या प्रमाणात CJP सोबत तुलना करत चर्चा घडवून आणल्या जात आहे. CJP च्या आंदोलनाप्रमाणेच आता तरुणांचे आरक्षण विरोधी आंदोलन उभा राहील का अशी चर्चा करत आहेत. वास्तविक हे हॅण्डल तसे CJP च्या तुलनेत कुठेच नाही. CJP च्या फॉलोवर्स चे 20% फॉलोवर्स सुद्धा या हँडलला मिळत नाहीयेत. तसेच यातुन कुणीही आरक्षण विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करायलाही पुढे येताना अघ्याप दिसत नाही.

भारतीय समाजात प्रचंड जातीयता आणि विषमता आहे. या जातीव्यवस्थेनुसार काही ठराविक जातींनाच शिक्षण घेण्याचा व देण्याचा, राज्यकारभार व प्रशासन चालवण्याचा, संपत्ती बाळगण्याचा, इत्यादी अधिकार होता. तर शोषित जातींवर मेहनतीची, हलक्या व निकृष्ट दर्जाची कामे लादून गुलाम करण्यात आले होते. त्यांच्यावर अस्पृश्यता लादण्यात आली होती. हे जातीव्यवस्थेने घातलेले आरक्षण होते. ते संपवुन भारतीय संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिनिधित्वाची शास्वती म्हणजेच आजचे संविधानिक आरक्षण दिल्या गेले. हे एक ऐतिहासिक क्रांतिकारी पाऊल होते. कारण जातीव्यवस्थेने लादलेल्या ठराविक कामांमुळे भारतीयांमध्ये गुणवत्ता उरलेली नव्हती. या संधीच्या समानतेने देशातील बहुसंख्य बहुजनांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली.

परंतु या देशात समानता नको असलेली, आपले जातीय विशेषाधिकार आणि वर्चस्ववाद अबाधित ठेवायची इच्छा असणारी लोकं सुद्धा आहेत. त्यांचा या सर्वांना समान संधी देणारा कार्यक्रम नको आहे. म्हणून ते आरक्षणाविरुद्ध वेगवेगळे खोटे नॅरेटिव्ह पसरवत असतात. त्यातील एक महत्वाचा नॅरेटिव्ह असतो की आरक्षण घेऊन येणाऱ्यांमध्ये गुणवत्ता नसते. आरक्षणामुळे उत्पादकता कमी होते. आरक्षणामधून आलेले निकृष्ट दर्जाचे काम करतात. हे सगळे नॅरेटिव्ह धादांत खोटे असुन ते आकड्यांच्या आधारे खोटे ठरले आहेत. अश्विनी देशपांडे आणि थॉमस वेस्कॉफ यांनी "डज अफरमेटिव्ह ऍक्शन्स अफेक्ट प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया" या नावाने संशोधन प्रसिद्ध केलं आहे. ते इंटरनेट वरही उपलब्ध आहे, आपण वाचु शकतो. भारतीय रेल्वे मधील आरक्षणामुळे नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय रेल्वेची उत्पादकता कमी नाही तर आधी पेक्षा जास्त वाढवली आहे हे आकड्यांच्या आधारे सिद्ध केलं आहे. भारतात ज्या ज्या क्षेत्रात आरक्षण लागु झाले आहे त्या क्षेत्राची उत्पादकता नक्कीच वाढली आहे. आरक्षणामुळे देशातील विविध समाज घटकांना टॅलेंट सिद्ध करण्याची संधी त्या क्षेत्रास मिळाल्याने ते अधिक उपयुक्त आणि कार्यक्षम झाले आहेत. तसेच अधिकाधिक लोक हिताचे सुद्धा झाले आहेत. तर ज्या ज्या क्षेत्रात खाजगीकरण होत आहे. खाजगीकरणामुळे आरक्षण नष्ट केल्या जात आहेत ते लोक हिताच्या उद्देशापासून दुर जात आहेत हे ही आपण बघु शकतो. आरक्षणाद्वारे आलेले खुल्या प्रवर्गातून आलेल्या पेक्षा जास्त सामाजिक असतात आणि समज हिताला प्राधान्य देतात, तर खुल्या प्रवर्गातून आलेले वयक्तिक प्रगतीकडे लक्ष देतात. हे आपण दैनंदिक जीवनात बघु शकतो. खुल्या प्रवर्गातून आणि तथाकथित उच्च समाज घटकांतून असलेले डॉक्टर खाजगी दवाखान्याच्या व्यवसायाकडे जास्त वळतात. तर आरक्षित जागांवरून झालेले डॉक्टर्स गाव खेड्यात जाऊन शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या कार्यात असतात. आरक्षित जागांवरून आलेल्यांमध्ये "पे बॅक टु सोसायटी" ही भावना असते. त्यातून ते समाजहिताचा आणि देशहिताचा विचार करत असतात.

आरक्षण विरोधी दावा करत असतात की आरक्षणामुळे आपला देश विकसित होत नाही. जगातील विकसित देशांमध्ये कुठे आरक्षण नाही. तर हा दावा पूर्णतः सपशेल खोटा आहे. आज जगात जितके विकसित देश आहेत जवळपास त्या सगळ्या देशांमध्ये तिथल्या तिथल्या शोषित, वंचित घटकांना आरक्षण आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे म्हणूनच ते विकसित आणि प्रगत झालेले आहेत. अमेरिके सारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशात "अफरमेटीव्ह ऍक्शन" या नावाने तिथल्या "ब्लॅक" वंशाच्या लोकांसाठी सर्व क्षेत्रांत आरक्षण आहे. त्यांचे प्रामाणिक व पारदर्शकपणे रोस्टर मेन्टेन केल्या जाते. त्यामुळेच तो देश महासत्ता होऊ शकला आणि बराक ओबामा सारखा "ब्लॅक" त्या देशाचा प्रमुख होऊ शकला. अमेरिकेने हे आरक्षणाचे धोरण भारतीय संविधान लागु झाल्याच्या नंतर 1960 साली लागु केले. तसेच "ब्लॅक" आणि महिलांना मताधिकार सुद्धा भारतीय संविधानात लागु झाल्याच्या नंतर दिल्या गेले आहेत. युरोप मधील अनेक राष्ट्रांत आरक्षण आहे. भारतीय संविधानात सुचवले गेलेले आरक्षण, सर्व समाज घटकातील व्यक्तींना समान मताधिकार या तत्त्वांचे अमेरिकेसह जगभर अनुकरण झाले आहे. म्हणूनच ते देश विकसित व प्रगत झाले आहेत. याउलट भारत केवळ त्याच क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे ज्यात आरक्षण असल्याने सर्व समाज घटकांचा सहभाग आहे. ज्या क्षेत्रात आरक्षण नाही त्या क्षेत्रात भारत जगाच्या तुलनेत कुठेच नाही.

आज कुठलीही जात, कुठलाही समुह आरक्षणापासून वंचित राहिलेला नाही. भारतातील सर्वच्या सर्व 100% जातींना आज आरक्षण आहे. जे खुल्या प्रवर्गात होते त्यांना "इकॉनॉमिकल विकर सेक्शन" या नावाने आरक्षण दिलं गेलं आहे. हे आरक्षण केवळ त्या खुल्या प्रवर्गातील सवर्ण जातींनाच मिळावं याची खात्री करण्यासाठी त्यात SC, ST, OBC व इतर सर्व आरक्षित प्रवर्गात असलेल्या जातींतील "इकॉनॉमिक विकर सेक्शन" ला अन्यायकारक रित्या प्रतिबंध घातला आहे. हा प्रतिबंध अस्पृश्यते मधील प्रतिबंधा सारखाच आहे. कारण या जातींमध्ये "इकॉनिक विकर" असणाऱ्या, गरीब असणाऱ्यांची संख्या खुल्या प्रवर्गातील सवर्ण जातींपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु तरीही त्यांना "इकॉनॉमिक विकर सेक्शन" या ओळखीचा भाग होण्यास मनाई आहे.

CJP च्या आंदोलनाने एक फार महत्वाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे या देशातील युवा पिढीत आघ्याप जाती, धर्माचे भेद कुठे दिसत नाहीत. सर्व समाज घटकांतील तरुण एकत्रित आंदोलनात सहभागी होते. यात भेद निर्माण करून त्यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न नक्कीच सत्ताधारी आणि आरएसएसशी संबंधित लोक करत आहेत आणि करतील. याला gen z बळी पडू नये हीच अपेक्षा!!!

Updated : 1 Aug 2026 11:19 AM IST

Tags: reservation issue reservation debate reservation controversy Gen Z India Gen Z politics caste reservation SC ST OBC reservation EWS reservation reservation news India politics Maharashtra politics social justice constitution of India caste census

Follow



Next Story

इंस्टाग्राम या समाज माध्यमात तयार झालेला अभिजित दिपकेचा कॉक्रोक जनता पार्टी हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. CJP ने केलेल्या आंदोलनात देशातील सर्व समाज घटकातील तरुणाई एकोप्याने सहभागी झालेली दिसली. अभिजित दीपके या दलित जातीत जन्मलेल्या तरुणाच्या नेतृत्वाला मोठ्या प्रमाणात सवर्ण जात समूहातील तरुणांनी प्रतिसाद देणे ही मुळात या देशातील एक क्रांतिकारी घटना आहे. हे आंदोलन सुरू असताना यातील तरुणांची एकजूट मोडून काढण्यासाठी, तरुणांत जातींच्या आधारे फूट पडण्यासाठी आरक्षणाचा विषय पुढे करण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे तरुण काय त्याला अघ्याप बळी पडले नाहीत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra