Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आषाढी एकादशी पर्यंत राज्यात पावसाचा जोर

आषाढी एकादशी पर्यंत राज्यात पावसाचा जोर

Max Maharashtra 5 days ago

गेल्या काही दिवसांपासून खंड पडलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, आषाढी एकादशी (२५ जुलै) पर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २६ जुलैपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी मॅक्स किसानशी बोलताना व्यक्त केला.

खुळे यांच्या मते, महाराष्ट्रात सुरू असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या आवर्तनामुळे पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता कायम राहील. विशेषतः २२ आणि २३ जुलै रोजी पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

२६ जुलैपासून 'या' १८ जिल्ह्यांना उघडीप

रविवार, २६ जुलै (द्वादशी) ते ३१ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, पुणे विभागातील काही भाग, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील आठ जिल्हे अशा एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होऊन उघडीप मिळण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

माणिकराव खुळे यांच्या मते, हवामानातील दोन महत्त्वाच्या बदलांमुळे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. देशाच्या मध्यभागावरील पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा (Monsoon Trough) सरासरी स्थानापेक्षा उत्तरेकडे, उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील उंचीवरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेशकडे सरकल्यामुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येणारे बळकट मान्सून वारे काहीसे कमकुवत होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होऊन उघडीप जाणवू शकते.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज?

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील पावसाची पुढील स्थिती त्या काळात निर्माण होणाऱ्या वातावरणीय प्रणालींवर अवलंबून असेल. २ ऑगस्ट (संकष्टी चतुर्थी) दरम्यान तयार होणाऱ्या हवामान प्रणालींच्या आधारे पुढील पावसाचा अंदाज अधिक स्पष्ट होईल, असे खुळे यांनी सांगितले.

धरणसाठ्यावर काय परिणाम?

जुलै महिन्यात २ ते ८ जुलै आणि १७ ते २५ जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे धरणे आणि इतर जलाशयांतील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या ही वाढ मर्यादित असली तरी ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. पुढील पाच दिवस अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतीतील फवारणी, खत व्यवस्थापन आणि काढणीची कामे स्थानिक हवामानाचा अंदाज पाहूनच करावीत. तसेच नदी-नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Forecast, Maharashtra Weather Update, Ashadi Ekadashi Rain, Heavy Rain Maharashtra, Monsoon 2026, Maharashtra Monsoon Forecast, Manikrao Khule, Weather Expert Maharashtra, Rain Alert Maharashtra, IMD Weather Update, Konkan Rain, Vidarbha Rain, Marathwada Weather, Khandesh Rain Forecast, Nashik Rain, Pune Weather, Mumbai Rain Update, Dam Water Levels Maharashtra, Monsoon News, Max Kisan

Updated : 22 July 2026 10:09 AM IST

Follow



Next Story

गेल्या काही दिवसांपासून खंड पडलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, आषाढी एकादशी (२५ जुलै) पर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर २६ जुलैपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी मॅक्स किसानशी बोलताना व्यक्त केला.

२६ जुलैपासून 'या' १८ जिल्ह्यांना उघडीप

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पावसाचा अंदाज?

धरणसाठ्यावर काय परिणाम?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra