मुंबई | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांत राज्यभर मोठी धडक कारवाई करत बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाशी संबंधित दिव्या फार्मसी, हरिद्वार या उत्पादकाच्या विविध औषध उत्पादनांवर कारवाई केली आहे.
या मोहिमेत राज्यभरातून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषधसाठा जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाच्या दिव्या फार्मसी, हरिद्वार या उत्पादक कंपनीच्या विविध उत्पादनांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम आणि दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या जाहिरातींविरोधात ही मोहीम राबविण्यात आली.
मुंढेंचा स्पष्ट इशारा : "आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही !"
पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांत तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी कारवाई करण्यात आली.
मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय,"जनतेची फसवणूक करणाऱ्या आणि आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही."
Delete Editकोणत्या ठिकाणी किती जप्ती ?
कोकण विभाग - 18.58 लाख रुपयांचा साठा जप्त
पुणे विभाग - 14.68 लाख रुपयांचा साठा जप्त
नागपूर विभाग - 7.26 लाख रुपयांचा साठा जप्त
नाशिक विभाग - 7.10 लाख रुपयांचा साठा जप्त
बृहन्मुंबई - 1.85 लाख रुपयांचा साठा जप्त
अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभाग - 1.90 लाख रुपयांचा साठा जप्त
याशिवाय तपासणीदरम्यान २ मिसब्रँडेड अॅलोपॅथी औषधांचा तब्बल 21.83 लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला.
कशामुळे झाली कारवाई ?
एफडीएच्या निदर्शनास आले होते की काही आयुर्वेदिक औषधांच्या जाहिरातींमध्ये -
* कॅन्सर, मधुमेह, स्थूलता यांसारख्या गंभीर आजारांवर हमखास उपचाराचा दावा
* चमत्कारिक परिणामांचे आश्वासन
* वैज्ञानिक आधार नसलेले आरोग्यविषयक दावे
* कायद्याने प्रतिबंधित प्रचार
अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल केली जात होती.
थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा
एफडीएने स्पष्ट केले आहे की, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० तसेच इतर संबंधित कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे *थेट न्यायालयीन कारवाई* करण्यात येणार आहे.
नागरिकांनाही आवाहन
एफडीएने नागरिकांना भ्रामक जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेणे धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
नवीन मोबाईल अॅप लवकरच
* तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप
* टोल-फ्री हेल्पलाइन
* तक्रारदाराची संपूर्ण गोपनीयता
या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Updated : 29 May 2026 8:14 PM IST
Tags: Tukaram Mundhe Baba Ramdev Patanjali Group Divya Pharmacy Max MaharashtraFollow

Next Story
मुंबई | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चार दिवसांत राज्यभर मोठी धडक कारवाई करत बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाशी संबंधित दिव्या फार्मसी, हरिद्वार या उत्पादकाच्या विविध औषध उत्पादनांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत राज्यभरातून ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषधसाठा जप्त करण्यात आला.
मुंढेंचा स्पष्ट इशारा : "आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही !"
कोणत्या ठिकाणी किती जप्ती ?
कोकण विभाग - 18.58 लाख रुपयांचा साठा जप्त
पुणे विभाग - 14.68 लाख रुपयांचा साठा जप्त
नागपूर विभाग - 7.26 लाख रुपयांचा साठा जप्त
नाशिक विभाग - 7.10 लाख रुपयांचा साठा जप्त
कशामुळे झाली कारवाई ?
* चमत्कारिक परिणामांचे आश्वासन
* वैज्ञानिक आधार नसलेले आरोग्यविषयक दावे
* कायद्याने प्रतिबंधित प्रचार
अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल केली जात होती.
थेट न्यायालयीन कारवाईचा इशारा
नागरिकांनाही आवाहन
नवीन मोबाईल अॅप लवकरच
* तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप
* टोल-फ्री हेल्पलाइन
* तक्रारदाराची संपूर्ण गोपनीयता
या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

