मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर शासकीय वसतिगृहात, चेंबूर मुंबई येथील विद्यार्थिनींना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या (समाज कल्याण विभागाच्या) अखत्यारीत येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना पिण्यासाठी, आंघोळीसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले पाणी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत त्रासदायक झाले आहे.
पाणी ही मूलभूत गरज आहे, कोणतीही सुविधा किंवा उपकार नाही. शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींना अभ्यास करण्याऐवजी पाण्याच्या समस्येशी झगडावे लागत आहे. दररोज उद्भवणाऱ्या या समस्येमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर, स्वच्छतेवर, मानसिक स्वास्थ्यावर आणि शैक्षणिक दिनचर्येवर परिणाम होत आहे. विशेषतः मुलींच्या वसतिगृहात पाणी उपलब्ध नसणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.
विद्यार्थिनींच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असताना, वारंवार पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणे ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी समाज कल्याण विभागाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
विद्यार्थिनींची मागणी स्पष्ट आहे की, वसतिगृहात पाण्याचा नियमित आणि पुरेसा पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा. तसेच भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
प्रशासनाने विद्यार्थिनींच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या समस्येची तातडीने दखल घ्यावी आणि प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडवावा. विद्यार्थिनींना केवळ आश्वासने नकोत, तर मूलभूत सुविधा हव्या आहेत. शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी आंदोलन करावे लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
विद्यार्थिनीची ठाम मागणी आहे. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा, विद्यार्थिनींच्या मूलभूत हक्कांचा आदर करा आणि त्यांच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करा.
'पाणी आमचा हक्क आहे, उपकार नाही!'
'शिक्षणासाठी आलो आहोत, मूलभूत सुविधांसाठी संघर्ष का करावा?'
'विद्यार्थिनींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध!'
- माता रमाबाई आंबेडकर शासकीय वसतिगृह चेंबूर मुंबईतील विद्यार्थिनी
Chembur girls hostel water shortage, Mata Ramabai Ambedkar Government Hostel, Chembur hostel news, Mumbai water crisis, government hostel water shortage, girls hostel Mumbai, students protest warning, hostel water supply problem, Maharashtra Social Justice Department, Social Welfare Department Maharashtra, Mumbai local news, Chembur news today, water shortage in government hostel, students basic facilities, Maharashtra education news, Max Maharashtra
Updated : 13 Oct 2026 2:20 PM IST
Follow

Next Story