भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झालीय...२१ वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीत मुंढे यांची ही २५ वी बदली आहे...
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदजी मुंढे यांची बदली करण्यात आलीय...
याआधी मुंढे हे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत होते...
मात्र, अवघ्या दीड महिन्यातच त्यांची पुन्हा एकदा बदली झालीय...
शिस्तप्रिय, पारदर्शक कारभारासाठी कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे...संवैधानिक पद्धतीनं काम करतांना कुठल्याही दबावाला किंवा राजकीय
हस्तक्षेपाला मुंढेंनी कधी भीक घातलेली नाही... त्यामुळंच त्यांची कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली होते, हा आजवरचा अनुभव आहे...
IAS तुकाराम मुंढे यांची कारकीर्द :
ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सप्टेंबर 2007 - उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 - मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम
जून 2010 - मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण
जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त, मुंबई
नोव्हेंबर 2014 - जिल्हाधिकारी, सोलापूर
मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन विभाग
डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
मे 2026 - आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात जसे तुकाराम मुंढे आपल्या कठोर आणि नियमप्रिय कामकाजासाठी ओळखले जातात, तसेच हरियाणातील IAS अधिकारी अशोक खेमका हे देखील वारंवार बदल्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. आपल्या प्रामाणिक आणि पारदर्शक कारभारामुळे अशोक खेमका यांची तब्बल ५७ वेळा बदली करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनात कठोर आणि नियमांवर ठाम राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कठोर प्रशासनामुळे कायम चर्चेत
नवी मुंबई महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. नाशिक महापालिकेत प्रशासनातील शिस्तीवर भर दिला, तर नागपूर महापालिकेत कोरोना काळात घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे ते विशेष चर्चेत आले होते. पीएमपीएलमध्ये असताना तिकीट तपासणी आणि आर्थिक शिस्तीवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या अनेक निर्णयांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. मात्र काही निर्णयांमुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात वादही निर्माण झाले होते.
वारंवार बदल्यांमागे नेमकं काय?
नियमांनुसार कोणत्याही अधिकाऱ्याचा एका पदावर साधारण तीन वर्षांचा कार्यकाळ अपेक्षित असतो. मात्र तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत अनेकदा अल्पावधीतच बदली करण्यात आल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. कठोर निर्णय, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि कोणत्याही दबावाला न झुकणारी भूमिका यामुळेच त्यांची वारंवार बदली होत असल्याची चर्चा अनेकदा रंगते. तर काहींच्या मते प्रशासनातील समन्वय आणि कार्यपद्धतीमुळेही त्यांच्याभोवती वाद निर्माण झाले.
प्रशासनातील मोठा प्रश्न :
एका प्रामाणिक आणि नियमप्रिय अधिकाऱ्याच्या वारंवार होणाऱ्या बदल्या प्रशासनासाठी योग्य आहेत का, असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदल्यांमागे नेमकं कारण काहीही असो, मात्र त्यांच्या कार्यशैलीची चर्चा राज्यभर कायम राहिली आहे.
Updated : 20 May 2026 4:25 PM IST
Tags: **YouTube Keywords:** IAS Tukaram Mundhe Tukaram Mundhe Transfer IAS Tukaram Mundhe Transfer News Tukaram Mundhe Latest News Tukaram Mundhe IAS IAS Officer Tukaram Mundhe Tukaram Mundhe Transfer Reason Maharashtra IAS News Tukaram Mundhe Badli IAS Transfer Maharashtra Tukaram Mundhe Viral News Maharashtra Administration News Marathi News IAS Officer News Tukaram Mundhe Story Maharashtra Political News Tukaram Mundhe Update IAS News Marathi MaxMaharashtra Tukaram Mundhe 25 Transfers .Follow
Next Story
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदजी मुंढे यांची बदली करण्यात आलीय... याआधी मुंढे हे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत होते...
मात्र, अवघ्या दीड महिन्यातच त्यांची पुन्हा एकदा बदली झालीय...
IAS तुकाराम मुंढे यांची कारकीर्द :
ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सप्टेंबर 2007 - उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 - मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम
जून 2010 - मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण
जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त, मुंबई
नोव्हेंबर 2014 - जिल्हाधिकारी, सोलापूर
मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन विभाग
डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
मे 2026 - आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
कठोर प्रशासनामुळे कायम चर्चेत
वारंवार बदल्यांमागे नेमकं काय?
प्रशासनातील मोठा प्रश्न :

