Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IAS Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन; सर्वत्र शोककळा

IAS Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन; सर्वत्र शोककळा

Max Maharashtra 1 month ago

रिष्ठ प्रशासकीय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. ही माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या आई अश्रुबाई हरिभाऊ मुंडे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

(IAS Tukaram Mundhe)

आईचा मृत्यू हा आयुष्यातील सर्वात मोठा आघात मानला जातो. या दुःखद प्रसंगी मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या कुटुंबीयांवरही शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांकडून मुंढे कुटुंबीयांचे सांत्वन व्यक्त केले जात आहे.

तुकाराम मुंढे सध्या पश्चिम बंगालमध्ये असून,ते आज सायंकाळी मुंबईत पोहोचणार आहेत. त्यानंतर ते तातडीने पुण्याकडे रवाना होणार असून, पुढे पुण्याहून बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे जातील.

त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या सकाळी ताडसोन्ना येथे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या मातोश्रींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज पुणे इथं अशोक मुंडे यांच्या डीएसके रोहन, मॉडेल कॉलनी, कानिटकर लॅब, जुन्या पोस्ट ऑफिसजवळ, शिवाजीनगर, पुणे इथल्या निवासस्थानी आज (२ मार्च) रात्री ९ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

Updated : 3 April 2026 10:28 AM IST

Tags: Tukaram Mundhe news IAS officer Mundhe family Asharaibai Mundhe death Beed district news Tadsonna village news Maharashtra condolence news senior IAS officer news breaking news Maharashtra Mundhe latest update Pune news today Mumbai to Beed travel news IAS officer personal news Marathi news today RIP news India तुकाराम मुंढे .

Follow

Next Story

वरिष्ठ प्रशासकीय IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. ही माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.त्यांच्या आई अश्रुबाई हरिभाऊ मुंडे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (IAS Tukaram Mundhe)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra