Tuesday, 26 Jan, 8.35 am Max Maharashtra

न्यूज अपडेट
लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, एका पायलटचा मृत्यू

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून एका पायटलचा मृत्यू झाला आहे. तर एका पायलटची प्रकृती गंभीर आहे. जम्मू कश्मीर आणि पंजाब सीमारेषेवर झालेल्या या अपघातात हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्याचं एका स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे.

HAL Dhruv असं दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचं नाव आहे. ही दुर्घटना हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कोणत्या दिशेनं जात होतं हेलिकॉप्टर?

हे हेलिकॉप्टर पंजाबच्या पठाणकोट येथून निघालं होतं. मात्र, लखनपूर जिल्ह्यात या हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग करावं लागलं. यामध्ये एका पायलटचा मृत्यू झाला आहे. तर एका पायलटची प्रकृती चिंताजनक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra
Top