Maharashtra Day 2026 आज 1 मे. International Workers Day 2026 जागतिक कामगार दिन. आणि मराठी माणसांसाठी आपला महाराष्ट्र दिन. 1 मे 1960 रोजी भाषिक प्रांतांच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
हा केवळ प्रशासकीय बदल नव्हता, तर ती असंख्य लोकांच्या संघर्ष, त्याग आणि स्वप्नांची पूर्तता होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रेरणेने मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य मिळावे, या मागणीसाठी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या लढ्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले.105 martyrs Samyukta Maharashtra त्यामुळे हा दिवस केवळ उत्सव नसून हुतात्म्यांच्या स्मरणाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि संघर्षाचा प्रतीक असलेला हा दिवस आपल्याला एकत्र येऊन आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी काम करण्याची प्रेरणा देणारा. आणि म्हणूनच 'जय महाराष्ट्र!' हा उदघोष आपल्या अभिमानाची आणि एकतेची भावना आहे. आजच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रधर्म मानणाऱ्या सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र!
महाराष्ट्राने देशाला काय दिलं ह्या प्रश्नाचे उत्तर देताना शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. Shivaji Maharaj and Maharashtra Dharmaबादशहाच्या दरबारी अपमान झाला असता जीवाची पर्वा न करता करारीपणे व्यक्त होणारे, त्याबद्दल नजरकैद भोगणारे व शिताफिने निसटून मुत्सद्दीपणाने स्वराज निर्माण करणारे शिवाजी महाराज महाराष्ट्राने देशाला दिले. महाराष्ट्राने देशाला महाराष्ट्रधर्म शिकवला, जो शिवरायांचा अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून जुलमी सत्तेविरुद्ध बंड करण्याचा व स्वराज्य स्थापनेचा धर्म आहे, वारकऱ्यांचा समतेचा भागवत धर्म आहे, निर्मिकाची कल्पना मांडणारा महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी संविधान लिहून समतेच्या वाटेवर देशाला नेऊन ठेवणारा आंबेडकरांचा मानवता धर्म आहे. याच महाराष्ट्रातील Sevagram Ashram Wardha वर्ध्यासारख्या ठिकाणी सेवाग्राम आश्रम काढणाऱ्या Father of the Nation, Mahatma Gandhi राष्ट्रपिता गांधीजीचा सत्य आणि अहिंसेवर आधारित सनातन धर्म आहे. आणि या सर्व विचारांना कवेत घेणारा संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष करणारा महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्म आपण विसरत चाललो आहोत की काय अशा प्रश्न आताशा पडू लागला आहे.
महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही, तर विचार, संस्कृती, आणि प्रगतीचा संगम आहे. समाजसुधारणा, अर्थव्यवस्था, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा आणि शेती या सर्व क्षेत्रांत महाराष्ट्राचे देशासाठी अमूल्य योगदान आहे. थोडक्यात, महाराष्ट्र हा देशाच्या अर्थकारणाचा, उद्योगाचा आणि पुरोगामी विचारांचा प्रमुख आधारस्तंभ राहिला आहे. आज महाराष्ट्राने देशाला राष्ट्र निर्माणासाठी उपयुक्त असलेलं सर्व काही दिलं आहे. महाराष्ट्राने देशाला असं काय दिलं नाही असा प्रश्न विचारायला हवा कारण आज देशामध्ये प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. त्याबद्दल महाराष्ट्र दिनी देशाला महाराष्ट्राने जाब विचारायलाच हवा. आज देशात सुरु असलेल्या गलिच्छ राजकारणाने महाराष्ट्रालाही सोडले नाही. पैसा आणि दहशतीच्या जोरावर राज्यात सत्तेवर असणारे पुरोगामी सरकार पाडून राज्याला रसातळाला नेणारे प्रतिगामी सरकार सत्तेत आले आहे. राज्याच्या हिताचा जराही विचार न करणारे विद्यमान राज्य सरकार फक्त केंद्रसरकारची तळी उचलणारे आहे. त्या सरकारला महाराष्ट्रधर्माची आठवण आजच्याच दिवशी करून द्यायला हवी.
आज जीडीपीचा विचार करता देशातील सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत पूर्ण देशभरातून विशेषतः उत्तर भारतासारख्या मागास राज्यांतून पोट भरण्यासाठी कष्टकरी येत असतात आणि मुंबई उदार मनाने त्यांना आपल्यात सामावून घेत असते. करोडोंची पोशिंदी असणारी अशी ही मुंबई ही महाराष्ट्राकडून देशाला मिळालेली एक देण आहे. म्हणूनच आपल्या या महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे हात पसरावे लागतात त्याबद्दल आपण आज महाराष्ट्र दिनी बोलायलाच हवे. संयुक्त महाराष्ट्राच्या भाषिक लढ्यात मुंबई महाराष्ट्राकडे राहावी यासाठी त्यावेळी गुजरातला पैसे द्यावे लागले होते हेही आपण विसरून चालणार नाही. आणि आता आर्थिक राजधानीतील पैसे वापरायला हवेत म्हणून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि ते शक्य नाही झाले तर तिला शक्य तेवढे लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राज्याच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी आज महाराष्ट्र दिनीच जाब विचारायला हवा.
आज उत्तरेतील प्रतिगामी राजकारणाच्या धर्तीवर महाराष्ट्राचे राजकारण चालवले जात आहे. हिंदीची सक्ती करून त्रिभाषा सूत्री राबवून शिक्षणाचा खेळखंडोबा केला जात आहे. अनुदान बंद करून मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. शिक्षण आणि आरोग्याचे बजेट कमी करून सार्वजनिक आरोग्य सेवेची वाट लावली आहे. राज्याच्या आधीच्या शेतीविषयक धोरणांना केराची टोपली दाखवून शेतकऱ्यांना जेरीस आणले जात आहे. बेरोजगारीवर उपाय न करता राज्यातील इतर भागातून मुंबईकडे येणाऱ्यांना थोपवणे व परप्रांतीयांना मुक्त प्रवेश देणे सुरु आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून जन क्षोभ होऊ नये म्हणून द्वेषाचे राजकारण खेळले जात आहे. आणि त्याला महाराष्ट्रातील जनता बळी पडताना दिसत आहे. हे चित्र फारच अस्वस्थ करणारे आहे.
महाराष्ट्राने देशाला दिलेलं सर्वात मोठं देणं म्हणजे परिवर्तनाचा विचार. Savitribai Phule education revolution महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि स्त्री-समतेसाठी क्रांती घडवली. Dr Babasaheb Ambedkar Maharashtra डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांची मूल्यं रुजवली. महाराष्ट्राने देशाला समाज सुधारण्याची दिशा दिली, जी आजही प्रेरणादायी आहे. धर्मनिरपेक्षतेच्या भक्कम पायावर उभा असलेला देश धर्माच्या नावावर पोखरून काढण्याचे काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उत्पत्ती ही जरी महाराष्ट्रातील असली तरी या सर्वाला समाजवादी रचनेचे उत्तर देऊ पाहणारे राष्ट्र सेवा दलही या मातीतलेच. आज देशाच्या संविधानाच्या भक्कम पायावर उभा असलेला भारतीय समाज, समतेचे आणि सलोख्याचे स्वप्न पाहतोय तो पुरोगामी महाराष्ट्रातीलच सलोख्यांच्या प्रदेशांच्या जोरावरचं. असं असताना जाती धर्माच्या नावावर महाराष्ट्रातील समाजात पडलेल्या फूटीला जबाबदार असणाऱ्यांना आजच्या महाराष्ट्र दिनी जाब तर विचारायलाच हवा.
एकेकाळी दिल्लीचेही तख्त राखण्याची क्षमता असणारा महाराष्ट्र पुन्हा वैभवशाली व्हायचा असेल तर परिवर्तनावरचा विश्वास परत एकदा मराठी माणसात जागवावा लागेल. Shahu Phule Ambedkar ideology शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या वाटेवरच्या महाराष्ट्र धर्माची आठवण मराठी मनांत चेतवावी लागेल, संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षाची, त्या 105 हुतात्म्यांच्या बलिदानाची मराठी माणसाच्या आठवणीतली ठिणगी परत एकदा पेटवावी लागेल. आणि मग पुन्हा एकदा बावनकशी सोन्यासारखा महाराष्ट्र धर्म लखलखू लागेल. तेव्हा खचितच महाराष्ट्राने देशाला काय दिले याची चर्चा रंगेल आणि परत एकदा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवू लागेल.
Maharashtra Day 2026, Maharashtra Day speech, Maharashtra Day article, Maharashtra contribution to India, Samyukta Maharashtra movement, Maharashtra Dharma meaning, Jai Maharashtra slogan, Maharashtra political issues, Mumbai financial capital of India, Maharashtra identity politics, history of Maharashtra Day, Maharashtra formation 1960, 105 martyrs Samyukta Maharashtra
Updated : 30 April 2026 5:31 PM IST
Follow
Next Story
Maharashtra Day 2026 आज 1 मे. International Workers Day 2026 जागतिक कामगार दिन. आणि मराठी माणसांसाठी आपला महाराष्ट्र दिन. 1 मे 1960 रोजी भाषिक प्रांतांच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा केवळ प्रशासकीय बदल नव्हता, तर ती असंख्य लोकांच्या संघर्ष, त्याग आणि स्वप्नांची पूर्तता होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रेरणेने मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य मिळावे, या मागणीसाठी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या लढ्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले.105 martyrs Samyukta Maharashtra त्यामुळे हा दिवस केवळ उत्सव नसून हुतात्म्यांच्या स्मरणाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि संघर्षाचा प्रतीक असलेला हा दिवस आपल्याला एकत्र येऊन आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी काम करण्याची प्रेरणा देणारा. आणि म्हणूनच 'जय महाराष्ट्र!' हा उदघोष आपल्या अभिमानाची आणि एकतेची भावना आहे. आजच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रधर्म मानणाऱ्या सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र!

