गणेश विसर्जन मिरवणुकीतील धार्मिक उत्साहाला राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भाची किनार मिळाल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. 'भोईराज गणेश मंडळा'च्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील काही लोकांच्या हातात नथुराम गोडसे, विनायक दामोदर सावरकर, माधव सदाशिव गोळवलकर आणि के. बी. हेडगेवार यांचे फोटो असलेले फलक दिसून आले.
तसेच '#अखंड भारत', 'No Compromise' आणि 'हल्क्यात घेतलं की वजनात ठोका' असा मजकूर असलेले फलकही मिरवणुकीत झळकवल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसते. काही जणांच्या हातात संबंधित व्यक्तींचे फोटो असलेले फलक आहेत. भगवे झेंडे, गाणी आणि फटाक्यांचा जल्लोषही या दृश्यांमध्ये पाहायला मिळतो.
एका फलकावर नथुराम गोडसे, तर दुसऱ्यावर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो असल्याचे दिसते. याशिवाय गोळवलकर आणि हेडगेवार यांचे फोटोही काही फलकांवर पाहायला मिळतात. या दृश्यांमुळे गणेश विसर्जनासारख्या धार्मिक-सामाजिक उत्सवाच्या मिरवणुकीत अशा राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भांचा समावेश का करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत हे फोटो का?
महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकत्रीकरणाची प्रदीर्घ परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक सामाजिक स्वरूप दिल्यानंतर हा उत्सव धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक सहभागाचे व्यासपीठ म्हणून विकसित झाला. अशा पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत गोडसे, सावरकर, गोळवलकर आणि हेडगेवार यांसारख्या ऐतिहासिक-राजकीय संदर्भ असलेल्या व्यक्तींचे फोटो झळकवल्याने या प्रदर्शनामागील नेमका संदेश काय होता? सामाजिक सलोख्याला बाधा आणण्याचा प्रयत्न होता का? असा प्रश्न उपस्थित होतो.
विशेषतः 'अखंड भारत', 'No Compromise' आणि 'हल्क्यात घेतलं की वजनात ठोका' अशा मजकुरामुळे या फलकांचा संदर्भ अधिक महत्त्वाचा ठरतो.
गणेशोत्सव हा धार्मिक आणि सामाजिक उत्सव मानला जातो. अशा उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत महात्मा गांधींच्या हत्येशी संबंधित नथुराम गोडसेचा फोटो प्रदर्शित करण्यामागील नेमका संदर्भ अद्याप स्पष्ट झालेला नाही. हा फलक गणेश मंडळाच्या अधिकृत भूमिकेचा भाग होता की काही सहभागींची स्वतंत्र कृती, याबाबतही माहिती समोर आलेली नाही. संबंधित गणेश मंडळाकडून या प्रकाराबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जाते का ? हे पाहणे महत्त्वाचे राहील.
Nashik Ganesh Visarjan, Nashik Ganesh Immersion, Nathuram Godse Photo, Godse Photo in Ganesh Procession, Nashik Ganesh Procession, BhoiRaj Ganesh Mandal, Veer Savarkar, Savarkar Photo, Akhand Bharat, No Compromise, Ganesh Visarjan News, Nashik News, Maharashtra News, Ganeshotsav 2026, Nashik Ganeshotsav, Political Posters in Ganesh Procession, Nathuram Godse, Maharashtra Ganesh Visarjan, Max Maharashtra
Updated : 26 Sept 2026 5:08 PM IST
Follow

Next Story
गणेश विसर्जन मिरवणुकीतील धार्मिक उत्साहाला राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भाची किनार मिळाल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. 'भोईराज गणेश मंडळा'च्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील काही लोकांच्या हातात नथुराम गोडसे, विनायक दामोदर सावरकर, माधव सदाशिव गोळवलकर आणि के. बी. हेडगेवार यांचे फोटो असलेले फलक दिसून आले. तसेच '#अखंड भारत', 'No Compromise' आणि 'हल्क्यात घेतलं की वजनात ठोका' असा मजकूर असलेले फलकही मिरवणुकीत झळकवल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत हे फोटो का?

