Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंकजा मुंडे भाजप सोडणार? की पक्षातच नव्या संघर्षाला सामोऱ्या जाणार?

पंकजा मुंडे भाजप सोडणार? की पक्षातच नव्या संघर्षाला सामोऱ्या जाणार?

Max Maharashtra 1 week ago

भाजपच्या अंतर्गत राजकारणात जुने आणि नवे नेतृत्व यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याची चर्चा सुरू असतानाच, पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावरही विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

मात्र, भाजपच्या जडणघडणीत मुंडे कुटुंबाचे योगदान आणि पक्षाशी असलेली त्यांची वैचारिक व भावनिक नाळ लक्षात घेता, त्या पक्ष सोडण्याची शक्यता कमी असल्याचे मत या लेखातून व्यक्त करण्यात आले आहे. हा लेख लेखकाचे वैयक्तिक राजकीय विश्लेषण आणि मत मांडतो.

पंकजा मुंडे यांच्या बद्दल कायम एक आपुलकी सहानुभूती वाटत राहिली... कदाचित आम्ही दोघी शिवाशेजारच्या ( नंदनज - नाथरा) म्हणून असेल... कदाचित माझ्या वडिलांची त्यांच्या वडिलांशी असणारी मैत्री हा ही एक धागा असेल... कदाचित आज आम्हा दोघींचेही वडील हयात नाहीत हेही एक भावनिक साधर्म्य असेल...

काहीही असो परंतु महिला राजकारणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या सुनेत्रा वहिनी असतील किंवा भाजपामध्ये असणाऱ्या पंकजा मुंडे असतील यांच्या बद्दल एक सहसंवेदना आहे.

मात्र पंकजा मुंडे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाबद्दलचं मत मात्र बदलेल अस अजिबात वाटत नाही.

भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे हा संघर्ष आता विकोपाला जात आहे. सत्ता काबीज करण्यासाठी ज्या छोट्या मोठ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने योगदान दिलं ते सगळे आता अडगळीला पडले आहेत आणि सत्ता काबीज केल्यानंतर ज्यांना तुरुंगात खडी फोडायला भाजप पाठवणार होती त्यांनाच अत्यंत प्रेमाने मांडीवर घेऊन घास भरवण्याची कसरत सध्या चालू आहे.

त्यामुळे भाजपाच्या पारंपारिक विचारसरणीत घडलेले जुने नेते कार्यकर्ते वैचारिक अधिष्ठान असणारे संघ पाईक ते विविध माध्यमांद्वारे भाजपचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यासाठी धडपडणारे कित्येक बिनपगारी हे सगळेच लोक हवालदिल झाले आहेत.

अशा सगळ्या वातावरणात चंद्रकांत पाटील असतील किंवा पंकजा मुंडे या मंडळींच्या मनात नैराश्य येणं फारच स्वाभाविक आहे. ( एकनाथ खडसे साहेबांनी याच शहकाटशहाच्या राजकारणाला कंटाळून पक्ष सोडला)..

पण पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्या शस्त्र वगैरे टाकून देणार हे अजिबातच पटत नाही.. त्या इतर पक्षातही कधी जाणार नाहीत... कारण महाराष्ट्रात हा पक्षच मुळात रुजवला तो खडसे - मुंडे - महाजनांनी...

त्या काळातली फडणवीस यांची ओळख म्हणजे मुंडे साहेबांची बॅग वागवणारा माणूस...

म्हणूनच पंकजा मुंडे या भाजपमध्ये भाडेकरू नाही तर घरमालक आहेत.

बाहेरून आलेल्या भाडेकरूंनी घरमालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी पंकजा मुंडे अधून मधून आपल्याच पक्षावरची नाराजी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत असल्या तरीसुद्धा भाजप सोडून इतर पक्षात त्या निश्चित जाणार नाही फार फार तर काही काळ स्व कोषात राहणे पसंत करतील.... किंवा मुलाला राजकारणात लाँच करतील...

साभार- सदर पोस्ट सुषमा अंधारे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे

Updated : 4 Aug 2026 12:50 PM IST

Tags: (Pankaja Munde BJP Maharashtra Politics BJP News Devendra Fadnavis Gopinath Munde Chandrakant Patil Eknath Khadse Political Analysis Maharashtra News BJP Leadership Indian Politics

Follow



Next Story

भाजपच्या अंतर्गत राजकारणात जुने आणि नवे नेतृत्व यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याची चर्चा सुरू असतानाच, पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावरही विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, भाजपच्या जडणघडणीत मुंडे कुटुंबाचे योगदान आणि पक्षाशी असलेली त्यांची वैचारिक व भावनिक नाळ लक्षात घेता, त्या पक्ष सोडण्याची शक्यता कमी असल्याचे मत या लेखातून व्यक्त करण्यात आले आहे. हा लेख लेखकाचे वैयक्तिक राजकीय विश्लेषण आणि मत मांडतो.

पंकजा मुंडे यांच्या बद्दल कायम एक आपुलकी सहानुभूती वाटत राहिली... कदाचित आम्ही दोघी शिवाशेजारच्या ( नंदनज - नाथरा) म्हणून असेल... कदाचित माझ्या वडिलांची त्यांच्या वडिलांशी असणारी मैत्री हा ही एक धागा असेल... कदाचित आज आम्हा दोघींचेही वडील हयात नाहीत हेही एक भावनिक साधर्म्य असेल...

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra