Wednesday, 21 Apr, 9.17 am Max Maharashtra

न्यूज अपडेट
राहुल गांधी यांना कोरोना अमित शहा यांचे ट्वीट

राहुल गांधी यांना कोरोना अमित शहा यांचे ट्वीट

Rahul Gandhi Tests Positive pm Narendra modi pray for Rahul Gandhis good health

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कोरोना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करून ते लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांची तब्येत लवकर बरी व्हावी. असं अमित शहा यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना कोरोना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करून राहुल गांधी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे...

लोकसभा खासदार राहुल गांधी यांना आराम मिळावा म्हणून मी प्रार्थना करतो. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना कोरोना झाला असून त्यांनी ट्वीटर द्वारे ही माहिती दिली आहे.

मला कोरोनाची सौम्य लक्षण आढळल्यानंतर मी टेस्ट केली. त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे. असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान देशात गेल्या 24 तासात सुमारे २ लाख ७३ हजार ८१० नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २४ तासात १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra
Top