Saturday, 25 Sep, 2.43 pm Max Maharashtra

न्यूज अपडेट
राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पावसाने विश्रांती दिली असली तरी पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात पावसाचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज आणखी तीव्र होऊ शकते. तसेच आगामी १२ तासात याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाला असून, राजस्थानमधून पाऊस आपला परतीचा प्रवास विलंबाने सुरू होईल. जवळपास ७ ते ८ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल असं सांगण्यात आलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Max Maharashtra
Top