विद्यार्थी आंदोलने भारतासाठी नवी नाहीत. मात्र, काही आंदोलने अशी असतात की ती केवळ एखादा निर्णय बदलून थांबत नाहीत; ती आंदोलनाची व्याख्याच बदलून टाकतात. अलीकडील ताज्या विद्यार्थी आंदोलनाने नेमके हेच सिद्ध केले.
या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची 'इश्यू-बेस्ड' भूमिका. जात, धर्म, पक्ष, विचारधारा किंवा व्यक्तिपूजेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी व्यवस्थेला थेट प्रश्न विचारला. व्यवस्थेने आत्मपरीक्षण करावे, उत्तरदायित्व स्वीकारावे, ही अपेक्षा या आंदोलनामागे होती.
काळ बदलतो, तशी आंदोलनांची भाषा आणि साधनेही बदलतात. आजच्या डिजिटल युगात सामाजिक माध्यमांवरील एकजूट किती प्रभावी ठरते, हे पाहिले. त्यामुळे काही दिवसांतच हा असंतोष राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. अभिजीत दीपके यांनी ही नेतृत्वाची नस ओळखली. नेतृत्व जरी नवे असले, तरी त्यामागे विद्यार्थी चळवळीचा अनुभव असलेली डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांची फळी उभी होती. नेतृत्वाची खरी परीक्षा ती निराशेला आशेत आणि विखुरलेल्या शक्तीला संघटित ऊर्जेत रूपांतरित करण्यात असते. हे या नेतृत्वाने साध्य केले. वर्षानुवर्षे मरगळ आलेल्या विद्यार्थी चळवळीला नवसंजीवनी मिळाली. अर्थात, प्रत्येक प्रभावी आंदोलनासोबत टीका, आरोप आणि पूर्वग्रहही येतात. मात्र, त्यांना बळी न पडता एका मुद्द्यावर ठाम राहणे, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवणे आणि संघर्षाची दिशा न बदलणे, ही या आंदोलनाची जमेची बाजू ठरली.
पुण्यातील पहिल्या आंदोलनात दिसलेली चुणूक पुढे व्यापक जनसमर्थनात परिवर्तित झाली. या आंदोलनाने भविष्यातील नेतृत्व करणाऱ्यांना एक मोलाचा व महत्त्वाचा संदेश दिला आहे. तो म्हणजे, विद्यार्थी चळवळी केवळ वैचारिक चौकटीत अडकून चालत नाहीत. त्या प्रत्यक्ष वेदना, अन्याय आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रश्नांशी जोडल्या गेल्या, तरच त्यांना व्यापक सामाजिक पाठबळ मिळते. आंदोलनाची ज्योत जिवंत ठेवण्यासाठी नेतृत्वाने सतत प्रेरणा द्यावी लागते आणि कार्यकर्त्यांनीही तितक्याच सजगतेने संघर्ष जिवंत ठेवावा लागतो.
आजच्या या आंदोलनाने एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध केली आहे. विद्यार्थी केवळ शिक्षण व्यवस्थेचे घटक नाहीत; ते लोकशाहीचे सजग भाग आहेत. जेव्हा त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, तेव्हा ते केवळ आंदोलन करत नाहीत, तर व्यवस्थेलाच आरसा दाखवतात. या आंदोलनाचे अंतिम यश एखाद्या निर्णयात किंवा राजीनाम्यात मोजता येणार नाही. त्याचे खरे यश असे की, त्याने विद्यार्थी चळवळीचा परिघ विस्तारला, संघर्षाची नवी पद्धत घडवली आणि नेतृत्वाच्या नव्या शक्यता निर्माण केल्या. हीच या आंदोलनाची सर्वात मोठी ऐतिहासिक नोंद ठरेल.
अँड.कुलदीप आंबेकर
संस्थापक, स्टूडंट हेल्पिंग हँड्स.
Student movement India, student protest India, student activism, issue-based protest, youth movement India, democratic protest, student leadership, education reforms India, digital activism, social media protests, youth politics, campus activism, student democracy, peaceful protest, public accountability, Indian students, protest politics, Abhijeet Deepke, Student Helping Hands, Kuldeep Ambekar, Maharashtra student movement, India education news, youth leadership, civic engagement, student rights, democratic participation, student mobilisation, protest movement analysis, India youth activism, social justice movement
Updated : 27 July 2026 1:24 PM IST
Follow
संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हॅंडस
Next Story
विद्यार्थी आंदोलने भारतासाठी नवी नाहीत. मात्र, काही आंदोलने अशी असतात की ती केवळ एखादा निर्णय बदलून थांबत नाहीत; ती आंदोलनाची व्याख्याच बदलून टाकतात. अलीकडील ताज्या विद्यार्थी आंदोलनाने नेमके हेच सिद्ध केले. या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची 'इश्यू-बेस्ड' भूमिका. जात, धर्म, पक्ष, विचारधारा किंवा व्यक्तिपूजेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी व्यवस्थेला थेट प्रश्न विचारला. व्यवस्थेने आत्मपरीक्षण करावे, उत्तरदायित्व स्वीकारावे, ही अपेक्षा या आंदोलनामागे होती.
अँड.कुलदीप आंबेकर
संस्थापक, स्टूडंट हेल्पिंग हँड्स.
संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हॅंडस

