Wednesday, 23 Sep, 10.37 am MHLive24.com

होम
आठवलेंची नवी कविता सोशलवर व्हायरल.. तुम्ही ऐकलीत का?

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- राजकीय नेतेमंडळी आपल्या काही अनोख्या कलागुणांमुळे नेहमीच सोशलवर चर्चेत राहतात. काहींचा आक्रमकपणा, तर काहींचे वादग्रस्त वक्तव्य यामुळे त्यांना ओळखले जाते.

मात्र असेच एक राजकीय व्यक्तिमत्व त्यांच्या भन्नाट कवितांमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज रामदास आठवले यांनी राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान काव्यवाचन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगार आणि

रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांना पाठिंबा जाहीर करत धमाल उडवून दिली. रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात काव्यात्मक मांडणी केली. काव्यवाचन करताना आठवले म्हणाले की,

  • मोदीजीने लिया है अपने उपर सभी मजदूरोंका भार
  • इसलिए उनको देश के मजदूर करते है प्यार!
  • संतोष गंगवार है आदमी सोबर
  • इसलिए उन्हे डिपार्टंमेंट मिला हे लेबर!
  • लेबरोंको न्याय देनेकी गंगवारजीमे है हिंमत
  • इसलिए हम सब उनको देते है हिंमत!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खांद्यावर सर्व मजुरांचा भार घेतला आहे. त्यामुळे देशातील मजूर त्यांच्यावर प्रेम करतात. तर कामगार कल्याणमंत्री संतोष गंगवार हे विचारी आणि शांतचित्त व्यक्ती आहेत.

त्यामुळे त्यांना कामगार खातं मिळालं आहे. त्यांच्यामध्ये कामगारांना न्याय देण्याची हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत, असा आठवलेंनी सादर केलेल्या या कवितेच अर्थ होतो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top