Wednesday, 23 Sep, 4.28 pm MHLive24.com

होम
ब्रेकिंग न्यूज: मोदी सरकार मधील या मंत्र्याचे कोरोनामुळे निधन !

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते,

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली आहे. बेळगाव मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर भाजपातर्फे ते निवडून गेले होते.

मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री आहेत. दरम्यान गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top