Wednesday, 23 Sep, 3.24 pm MHLive24.com

होम
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांच मोठं वक्तव्य; वाचा.

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज हे पक्षात नाराज असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये माजी मुख्यमंत्री फडणवीस,

तसेच अनेकांवर शरसंधान साधलेले आपण पहिले आहे. मी पक्षाविरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो.

चुकीच्या निर्णयाविरुद्ध बंड करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे खडसे यांनी एका कार्यक्रमात ठणकावून सांगितले.

आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे.

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, "एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे.

त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल".

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top