Wednesday, 23 Sep, 3.45 pm MHLive24.com

होम
गुड न्यूज! राज्यात एवढे रुग्ण झाले कोरोनामुक्त

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे, मात्र दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे रुग्णवाढी बरोबरच राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

राज्यात आज 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आज 21 हजार 29 नवीन रुग्णांचे निदान झाले.

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 12 लाख 63 हजार 799 झाली आहे. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 56 हजार 30 वर पोहोचली असून

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.65 टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 73 हजार 477 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top