Wednesday, 23 Sep, 2.53 pm MHLive24.com

होम
मोठी बातमी: मराठा आरक्षणासाठी 'ह्या' तारखेस 'महाराष्ट्र बंद'

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय आज कोल्हापूर मधील गोलमेज परिषदेत घेण्यात आला.

मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आयोजित गोलमेज परिषदेस सानेगुरुजी वसाहत मंदिर रावजी मंगल कार्यालय मध्ये सुरुवात झाली.

एक मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा निर्धार हात उंचावून व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. 'महाराष्ट्र बंद' दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

मात्र, 15 दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर 'महाराष्ट्र बंद' मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.

मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली.

महाराष्ट्र शासनाकडून केल्या जाणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती मिळावी, शिवस्मारकाचे काम तातडीने व्हावे, राज्यातील शेतकऱ्यांचे सरसकट वीजबिल माफ करावे,

कोपर्डी प्रकरणातील दोषींना त्वरित शिक्षा मिळावी, राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये वसतिगृहे व्हावीत, आदी ठराव परिषदेने मंजूर केले आहेत.

विजयसिंह महाडिक यांनी ठरावांचे वाचन केले तर भरत पाटील यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हे ठराव शासनाला पाठवले जाणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top