Sunday, 20 Sep, 7.30 am MHLive24.com

मनोरंजन
मोठी बातमी: सुशांत प्रकरणी आता 'तो' सीबीआय रडारवर

Mhlive24 टीम, 20 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI, NCB, ईडी, या तीन संस्था तपास करत आहेत.

रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली. सध्या या प्रकरणाचा सर्व तपास सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करीत आहे. सीबीआयकडून जवळपास सर्वच संबंधितांची आतापर्यंत चौकशी पूर्ण झाली आहे.

पण त्यात ठोस असे काही अद्याप सीबीआयच्या विशेष तपास पथकाच्या हाती आलेले नाही. त्याचवेळी या प्रकरणाचा संबंध सुशांतसिंहची माजी व्यवस्थापक दिशा सालियानशी असल्याचे काही धागेदोरे सीबीआय पथकाच्या हाती लागले आहे. यामुळेच त्या दिशेने तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे.

class="adsbygoogle" style="background:none;display:inline-block;max-width:800px;width:100%;height:100px;max-height:100px;" data-ad-client="ca-pub-9385025845051934" data-ad-slot="9434371502" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true">

दरम्यान, रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागिवल्याच्या कबुलीखेरीज अन्य एकही आरोप मान्य केले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यात तिला ड्रग्ज, वित्तपुरवठा, सुशांतसह युरोपमधील सहल, त्याचा ईमेल आणि सोशल मीडियातील अकाउंटचे पासवर्ड आदी माहिती विचारली.

सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थांचे विक्रेते झेड विलात्र, कैझान, अब्दुल बासित परिहार आणि अन्य काहींबाबत तिला प्रश्न विचारले. भाऊ शोविकची सुशांतशी केव्हा आणि कशी भेट घडवून आणली, याबद्दलही विचारणा करण्यात आली.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top