Wednesday, 23 Sep, 10.39 am MHLive24.com

होम
पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्याचा खर्च तुम्हाला माहित आहे का?

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे संकटामुळे देशाचे पंतप्रधान सध्या भारतात आहे. अन्यथा मोदी हे नेहमी विषेश दौऱ्यावरच असतात. त्यांच्या याच दौऱ्यावरून अनेकदा विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडवी टीका केली आहे.

दरम्यान मोदींचा विदेश दौरा हा मोठा खर्चिक असतो. ते आज आपण जाणून घेऊ.. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ ते २०१९ या काळात एकूण ५८ देशांचे दौरे केले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर एकूण तब्बल ५१७.८२ कोटी रुपये खर्च केला आहे. मंगळवारी राज्यसेभत ही माहिती दिली.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी मोदींचा परदेश दौरा व त्यांचा खर्च याबाबत संसदेत लेखी प्रश्न विचारला होता.

यावर उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले कि,

परदेश दौऱ्यांमुळे व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, सहकार, संरक्षण आणि जनसंपर्क आदी क्षेत्रात इतर देशांसोबत दृढ झाले आहेत.

तसेच विदेश संबंध वाढल्यामुळे आर्थिक विकासात वाढ आणि नागरिकांच्या कल्याणास चालना मिळाली आहे. भारताच्या राष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यामध्ये योगदान दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top