Wednesday, 05 Aug, 4.02 am MHLive24.com

स्पेशल
राम मंदिराच्या भूमिपूजन निमित्ताने जाणून घ्या 500 वर्षातल्या महत्वपूर्ण 14 घटना

Mhlive24 टीम, 5 ऑगस्ट 2020 :- अयोध्येतील राममंदिरचा वाद खूप वर्षे सुरु होता. शेवटी न्यायालयाने हा वाद निकाली काढून अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा वाद थांबवला.

त्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले. हा प्रवास अनेक शतकांचा आहे. या कालावधीत अनेक चढउतार आलेत. जाणून घेऊयात ऐतिहासिक राम मंदिर उभारणीच्या इतिहासातील महत्वाच्या १४ घटना.-

 • १) 1528: मुगल सम्राट बाबर याने अयोध्येत मंदिर पाडून तिथे मशिद बांधली असा आरोप.
 • २) 1885: सगळ्यात पहिले महंत रघबीर दास यांनी फैजाबाद कोर्टात अर्ज दाखल करून बाबरी मशिदीच्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी परवानगी मागितली मात्र ती फेटळली गेली.
 • ३) 1949 - 22-23 डिसेंबर, वादग्रस्त मशिदीमध्ये श्रीराम प्रभूंच्या मूर्ती गुप्तपणे आणण्यात आल्या.
 • ४)1959: निर्मोही आखाड्याने कोर्टात याचिका दाखल करत वादग्रस्त जागेचा ताबा देण्याची मागणी केली.
 • ५)1961: सेंट्रल सुन्नी वक्फ बोर्डाने कोर्टात धाव घेत मूर्ती मंदिरातून हटविण्याची मागणी केली. ६) 1986: हिंदूंना मूर्तीची पूजा करण्याची परवानगी फैजाबाद कोर्टाने दिली.
 • ७)1989: राजीव गांधी सरकारकडून विश्व हिंदू परिषदेला वादग्रस्त जागेजवळच शिला पूजन करण्याची परवानगी.
 • ८)1990: भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेला या वर्षात 25 सप्टेंबरला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने देशभरातलं वातावरण ढवळून निघालं.
 • ९)1992: देशभरातून लाखो कारसेवक अयोध्येत जमले आणि 6 डिसेंबरला वादग्रस्त मशिद जमीनदोस्त केली.
 • १०)2010: या वर्षी 30 सप्टेंबरला हिंदू, मुस्लिम आणि निर्मोही आखाडा यांना वादग्रस्त जागा विभागून देण्याचा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला.
 • ११) 2011: अलाहाबाद हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती.
 • १२) 2019: 9 नोव्हेंबरला सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ऐतिहासिक निकाल देत वादग्रस्त जागेवर मंदिराचा मार्ग प्रशस्त केला.
 • १३)वादग्रस्त जागेवरचा हिंदूंचा हक्क कोर्टाने मान्य केला आणि सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत मोक्याच्या जागेवर 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले.
 • १४) 2020: ५ ऑगस्ट 500 वर्षांचा वाद संपवून अयोध्येत भव्य मंदिराचं भूमिपूजन.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top