Wednesday, 23 Sep, 3.31 pm MHLive24.com

ब्रेकिंग
.तर थोबाड फोडो आंदोलन करू, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले. आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मुद्यावरून आता मराठा समाजातील नेत्यांनी 10 ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

याचबरोबर ९ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यास बंद मागे घेऊ तसंच पुढील काळात राज्यभर आंदोलन सुरु राहील.

नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.

'मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पण मदत कधी आणि कशी दिली जाईल याचा खुलासा होणं आवश्यक आहे.

सरकार फक्त घोषणा करत असून त्यांच्याकडे बजेट नाही, अधिवेशनात तरतूद नाही,' असं यावेळी त्यांनी म्हटलं.

'सरकारने ठरावांची अमलबजावणी केली नाही तर १० तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू,' असा इशारा यावेळी देण्यात आला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top