Wednesday, 23 Sep, 3.19 pm MHLive24.com

ब्रेकिंग
तुंबलेल्या मुंबईवरून दरेकरांचा शिवसेनेला खोचक टोला

Mhlive24 टीम, 23 सप्टेंबर 2020 :- हो शिवसेनेनं करून दाखवलं. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबई पाणी पाणी झाली. मुंबईची तुंबई झाली.

अखेर शिवसेनेनं करूनच दाखवलं असा खोचक टोला भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

दरम्यान मुंबईमध्ये काल दिवसभर पावसाने हाहाकार माजवला होता. यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन देखील ठप्प झाली आहे.

याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, 'शिवसेनेने मुंबईची तुंबई केली आहे.

मुंबईत वरवर कामं केली जात आहेत. ते मूळ मुद्द्याकडे लक्षच देत नाहीत. पावसाळा गेल्यानंतर काम करण्यासाठी 7 ते 8 महिने राहतात,

तरीदेखील काहीही कामं केली जात नाहीत. मागील 30 ते 40 वर्ष शिवसेनेने सत्ता उपभोगून काय केलं?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MHLive24.com
Top