Sunday, 12 Jul, 3.29 pm MPC News

अन्य बातम्या
Akurdi : प्रसिद्ध लेखक चेतन भगत बुधवारी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

एमपीसी न्यूज- 'कोरोना पलीकडे नोकरीची नवी क्षितिजे' या विषयावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी तर्फे आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलणार आहेत.

सर्वांसाठी खुला असणार्या या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.15) 11 ते 12.30 या वेळेत करण्यात येणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कॅम्पस तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती डॉ. शलाका पारकर यांनी दिली.

'कोरोना पलीकडील करिअरची नवी क्षितिजे' तसेच कोविड -19 च्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोविड -19 नंतरच्या नोकरीसाठी योग्य कौशल्य निर्माण करणे व त्यासाठीचे मार्ग आणि साधने ओळखणे यावर भर दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top