Sunday, 23 Feb, 8.06 pm MPC News

क्राईम न्यूज
Chinchwad : बहिणीला छेडल्याचा बनाव करून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - बहिणीला छेडल्याचा बनाव करून पाच जणांनी मिळून एका तरुणाला कोयत्याने मारहाण केली. तसेच हातपाय तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) रात्री अकरा वाजता चिंचवडेनगर आणि निगडी येथे घडला.

सागर रोहिदास चिंचवडे (वय 29, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिजित गोसावी (वय 25), योगेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील काही वर्षांपूर्वी सागर यांच्या चुलत बहिणीला छेडले होते. त्यावेळी सागर यांनी आरोपींना मारले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्या रागातून आरोपींनी त्यांच्या बहिणीला सागर यांनी छेडल्याचा बनाव केला आणि मागील काही वर्षांपूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेतला.

सागर यांच्या कपाळावर, डाव्या पायावर कोयत्याने वार केले. दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली. आरोपींनी सागर यांच्या दोन मित्रांना देखील धमकावले. सागर यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top