Friday, 03 Jul, 3.46 pm MPC News

क्रीडा
Harbhajan Singh Birthday: भज्जीच्या वाढदिवशी युवीच्या खास शुभेच्छा, विचारतोय वाढदिवस 40 वा की 47 वा?

एमपीसी न्यूज- भारतीय संघाचा ऑफस्पिनर हरभजन सिंग आज (दि.3) 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने हरभजनला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भज्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना युवीने भज्जीची फिरकी घेतली. युवराजने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवराज आणि हरभजन मजा करत असलेले व्हिडिओ आणि फोटो आहेत.

या पोस्टमध्ये युवराजने लिहिले आहे की, हा तुझा 40 किंवा 47वा वाढदिवस आहे ? या व्हिडिओमध्ये आमच्या एकत्रित अद्भुत वर्षांची झलक आहे, ज्यामध्ये आम्ही एकमेकांचे पायच नाही तर पँट देखील खेचली आहे. 'सिंग इज किंग' हे नेहमीच तू जगाला सिद्ध केले आहेस. क्वारंटाइननंतर 100 टक्के पार्टी हवी आहे. लव्ह यू पाजी! असे त्याने लिहिले आहे.

सुरेश रैनाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हरभजनला 'एक महान मॅच विनर' म्हणून संबोधले आहे. तसेच शिखर धवन, विराट कोहली, मोहम्मद कैफ, पार्थिव पटेल, यांनी हरभजन सिंगला शुभेच्छा दिल्या आहेत.

आयसीसी'ने हरभजनच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्याच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे.

हरभजन सिंगने 103 कसोटी सामन्यात 417, वनडेच्या 236 सामन्यात 269 तर 28 T20 सामन्यात 25 बळी घेतले आहेत. हरभजन सिंग मुंबई इंडियन्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होता. आता तो चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो. त्याने 160 सामन्यात 150 बळी घेतले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top