Wednesday, 05 Aug, 7.46 am MPC News

टॉप न्यूज
Hinjawadi: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल पळवला

एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तीन चोरट्यांनी एकाचा मोबाइल फोन आणि हेडफोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.2) रात्री साडेआठ वाजता वाकड येथे बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडली.

अमोल संजय चरपे (वय 34, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी चरपे घरी जात होते. ते बेंगलोर-मुंबई महामार्गावर फोक्सवॅगन कंपनीसमोर वाकड येथे आले असता अनोळखी तीनजण एका दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले.

तिघांनी चरपे यांचे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष विचलित केले. त्यानंतर आरोपींनी चरपे यांच्या टी शर्टच्या खिशातून मोबाइल आणि हेडफोन असा एकूण सात हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top