Monday, 23 Nov, 11.09 am MPC News

आरोग्य संपदा
India Corona Update : एकूण रुग्णसंख्या 91.39 लाखांवर, गेल्या 24 तासांत 44,059 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात मागील 24 तासांत 44 हजार 059 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर , 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 91 लाख 39 हजार 866 एवढी झाली आहे . तर , देशातील एकूण मृतांची संख्या 1 लाख 33 हजार 738 एवढी झाली आहे .

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 85 लाख 62 हजार 642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 43 हजार 486 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशात 41 हजार 024 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशाचा रिकव्हरी रेट चांगला असून तो सध्या 93.68 टक्के एवढा आहे. तर, मृत्यू दर 1.46 टक्के एवढा आहे. जगात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या देशात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी जगात भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे.

भारतात आतापर्यंत 13 कोटी 25 लाख 82 हजार 730 कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 8 लाख 49 हजार 596 चाचण्या रविवारी (दि.22) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक 81 हजार 512 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्याखालोखाल केरळमध्ये 65 हजार 982 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सात राज्य अशी जिथे अजूनही 20 ते 50 हजार दरम्यान सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व हरियाणा यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top