Friday, 18 Oct, 7.51 am MPC News

तळेगाव
Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे. धडधाकटांना लाजवेल, असा प्रचार दिव्यांग बांधव करीत असल्यामुळे मावळ परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्रवादी अपंग सेल मावळ उपाध्यक्ष आनंद बनसोडे, राजू थोरात, बाळासाहेब तरस, बाळासाहेब साळुंके, गणेश शेळके या प्रचार कार्यात हिरीरीने सहभागी होत आहेत.

या उपक्रमाबाबत उपाध्यक्ष आनंद बनसोडे म्हणाले कि, अण्णांनी अपंगांसाठी खूप मोठे काम केले आहे, विविध उपक्रमातून प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, काट्या, कॅलीबर , व्हील चेअर, जयपूर फूट, याचे मोफत वाटप केले आहे.

तळेगावात जोशीवाडा, इंद्रायणी कॉलेज, तळेगाव स्टेशन, भेगडे आळी, वराळे, सोमाटणे या ठिकाणी या अपंग बांधवांनी अण्णांचा प्रचार केला.

मावळ विधानसभेतून दिव्यंगांना सक्षम करण्यासाठी सर्वात मोठा हातभार सुनील शेळके यांचा आहे. स्वखर्चातून अण्णांनी मदतीचा हात पुढे केला, रोजगार मार्गदर्शन, अपंगासाठी उपक्रम, यामाध्यमातून अपंगांना ताकत निर्माण करून देण्याचे काम केले आहे, अण्णा घरोघर जाऊन अपंगांची विचारपूस करत असतात. त्यांनी अपंगांचे प्रमाणपत्र काढून दिले आहे. ८००च्या वर लोकांना युडीआयडी कार्ड मोफत काढून दिले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top