Friday, 18 Oct, 5.05 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Maval : गावांच्या विकासावरून विरोधकांकडून दिशाभूल

एमपीसी न्यूज - आमच्या गावचा विकास हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून झालेला आहे. उगाच कोणी टिकाटिपण्णी करत आपला वेळ वाया घालवू नये. यावेळी तालुक्याला मंत्रीच मिळणार आहे, अशा शब्दांत इंदोरी आणि माळवाडी गावात राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे प्रचार रॅलीचे स्वागत करण्यात आले.

आज झालेल्या प्रचारामध्ये नागरिकांनीच विरोधकांवर तोफ चालविली. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गरीब जनतेसाठी अनेक उपयोगी योजनांचा फायदा दिल्याने आणि त्या योजनांमुळे गरिबांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही आमच्या साहेबांच्या विकासाची पावती आहे, असे मत मावळ तालुका भाजपचे उपाध्यक्ष आणि माळवाडी गावातील भाजपचे नेते कालिदास शेलार यांनी व्यक्त केले.

यावेळी सर्व गावात एक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रचार रॅली ही विजयाची मिरवणूक असल्याचे यावेळी दिसून आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top