Thursday, 17 Oct, 8.52 am MPC News

तळेगाव
Maval : काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांचा प्रचाराचा धडाका

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांनी गावोगावी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे.

मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर अॅड. तिकोणे यांनी भर दिला आहे. ठिकठिकाणी कोपरासभा घेऊन ते निवडणूक लढविण्यामागील त्यांची भूमिका मतदारांना समजावून सांगत आहेत.

टाकवे, फळणे, भोयरे, कल्हाट, निगडे, आंबळे, मंगरूळ, नवलाख उंबरे, आंबी, बौर, सडवली, ओझर्डे आढे, उर्से, वडगाव मावळ या ठिकाणी अॅड. खंडूजी तिकोणे यांनी प्रचार दौरा केला. गुरुवारी वडगाव मावळ येथील आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी व नागरिकांची त्यांनी भेट घेतली व मतदानाचे आवाहन केले. सर्व ठिकाणी मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, असे अॅड. तिकोणे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>