Saturday, 28 Mar, 3.59 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Maval : राज्य सरकारच्या 'रक्तदान' आवाहनाला 'जय बहादूर क्रीडा मंडळ'चा प्रतिसाद; आयोजित केले रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - आंदर मावळमधील नागाथली गावामध्ये राज्यात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या रक्तदान आवश्यकता आवाहनाला हाक देऊन 'जय बहादूर क्रीडा मंडळ' तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विशेषतः मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजू खांडभोर, मावळ तालुका राष्ट्रवादी संघटनमंत्री नारायण ठाकर, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन छगन लष्करी, कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक शांताराम बापू लष्करी, युवा नेते शैलेश हेमाडे, उपविभाग प्रमुख हनुमंत ठाकर, सामाजिक युवा कार्यकर्ते विशाल तिकोने, युवानेते सुभाष खांडभोर, ग्रा पं सदस्य सोपान खांडभोर, बाळासाहेब पांडे पाटील पंकज खांडभोर, निवृत्ती ठाकर, गौरव शिंदे, बाबाजी पांडे, विजय खांडभोर जालिंदर ठाकर आदींनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देत स्वतः या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करून उत्तम संयोजन केले. शुक्रवार (दि 27) रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरासाठी मोरया ब्लड बँकेचे डॉ, मंगेश सावळे, डॉ,गणेश दुपली, डॉ,दिनेश पाटकर, डॉ,कमलेश डिंबळे, डॉ,किरण पांडे, डॉ,गणेश दळवी, डाॅ विक्रम देशमुख यांच्या सहकार्याने या विभागाचे पोलीस अधिकारी भाऊसाहेब कर्डिले, प्रवीण विरणक, ग्रामसेवक रत्नकांत रत्नपारखी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी प्रत्यक्ष येऊन शासनाने दिलेल्या आदेशानुसार विशिष्ट अंतर ठेवून व सर्व प्रकारची काळजी घेऊन हे शिबीर संपन्न झाले.

आंदर मावळातील ग्रामीण भागात रक्तदान शिबिर घेतल्या बदल गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी ग्रामीण भागातील हा पहिलाच स्तुत्य उपक्रम असल्याने गावक-यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

या शिबिरातील सर्व रक्तदान करणाऱ्यादात्यांचे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर यांनी ऋण व्यक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top