Wednesday, 24 Feb, 5.06 pm MPC News

होम पेज
Motera Stadium Renamed : मोटेरा स्टेडियमचं 'नरेंद्र मोदी स्टेडियम' असं नामकरण

एमपीसी न्यूज - जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असे बिरूद मिरवणाऱ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.

'नरेंद्र मोदी स्टेडियम' स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. आज (बुधवारी) दुपारी भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी सामना या मैदानावर खेळवला जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. आज खेळ जगतासाठी सुवर्णदिन असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केलं.

Gujarat: President Ram Nath Kovind inaugurates Narendra Modi Stadium, the world's largest cricket stadium, at Motera in Ahmedabad

Union Home Minister Amit Shah, Gujarat Governor Acharya Devvrat, Sports Minister Kiren Rijiju, and BCCI Secretary Jay Shah also present pic.twitter.com/PtHWjrIeeH

— ANI (@ANI)

असं आहे 'नरेंद्र मोदी स्टेडियम'
700 कोटींहून अधिक रुपये खर्च करुन 'नरेंद्र मोदी स्टेडियम' बांधले आहे. यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top