Friday, 20 Mar, 4.49 pm MPC News

टॉप न्यूज
Mumbai पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाचा कहर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ( शुक्रवार) महत्वपूर्ण घोषणा केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात हाहाःकार उडविण्याऱ्या कोरोनाने राज्यातही हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. शासकीय पातळीवर कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कडक उपयाययोजना केल्या जात आहे. तरीही दररोज कोरोनाच्या रुग्णांनात वाढ होतच आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली.

दरम्यान, इयत्ता दहावीच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top