Saturday, 28 Mar, 5.46 pm MPC News

टॉप न्यूज
Mumbai: राज्यात आज नवीन 14 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 167!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात आज (शनिवारी) नवीन 14 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 167 झाली आहे. मुंबईत आज 12 तर पुणे व नागपूरमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण सापडला.

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसअखेर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 153 होती. त्यात सकाळी सहा तर दुपारी 8 नव्या रुग्णांची भर पडली. मुंबईतील कोरोनीबाधितांचा आकडा 12 ने वाढून 63 झाला आहे.

उपचारानंतर कोरोनाबाधितांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह येत आहेत. अशाप्रकारे कोरोनामुक्त झालेल्या 19 जणांना आतापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top