Saturday, 14 Dec, 7.07 pm MPC News

होम पेज
New Delhi : इस्रोची उत्पन्नाचीही कोटींची उड्डाणेः मिळवले १२४५.१७ कोटी रुपये

एमपीसी न्यूज - अत्यंत किचकट, वेळखाऊ आणि ज्या कामांत अत्यंत उच्च दर्जाचे काम अपेक्षित असते, अशी उपग्रह प्रक्षेपणाची (सॅटेलाईट लाँचिंग) कामे अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देश आता अंतराळ संशोधनात अग्रगण्य असलेल्या भारतीय संस्थेकडे, इस्रोकडे विश्वासाने सोपवू लागले आहेत. उपग्रह प्रक्षेपणाच्या या कामातून इस्रोने गेल्या पाच वर्षांत सुमारे १२४५.१७ कोटी रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळवले आहे.

राज्यसभेत याबाबतची माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, इस्रोने गेल्या पाच वर्षांत एकूण २६ देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. 2014-15 या आर्थिक वर्षात 252.59 कोटी रुपये, 2016-17 या आर्थिक वर्षात 227.45 रुपये, 2017-18 या आर्थिक वर्षात 208.37 रुपये आणि 2018-19 आर्थिक वर्षात 324.19 असे एकूण मिळून 1245.17 रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

इस्रोने व्यापार करार केलेल्या देशांच्या यादीत महासत्ता अमेरिका, युके, जर्मनी, कॅनडा, सिंगापूर, नेदरलॅंड्स, जपान, मलेशिया, अलजेरिया आणि फ्रान्ससारखे बलाढ्य आर्थिक शक्ती असलेले देश आहेत, हे विशेष उल्लेखनीय.

यापुढील सर्व युद्धे ही क्षेपणास्त्रे, उपग्रह आदींचा वापर होणारी असणार आहेत. त्यामुळेच इस्रोचे हे भारताला प्रगतिपथावर नेणारे कार्य विशेष उल्लेखनीय ठरते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top