Saturday, 15 Feb, 7.49 pm MPC News

टॉप न्यूज
Pimple Gurav: नदीपात्रालगतच्या अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने पिंपळे गुरव येथील नदीपात्रालगतच्या पत्राशेडवर कारवाई केली. ही कारवाई आज (शनिवारी) करण्यात आली.

पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 मध्ये नदीपात्रालगत अनधिकृत बांधकामे, पत्राशेड थाटली आहेत. पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रालगतची बांधकामे पाडण्याचे आदेश दिले आहेत. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक परिसरातील नदीपात्रालगतचे 10 पत्राशेड अंदाजे क्षेत्रफळ 12500 चौरस फुट इतके बांधकाम संबंधित भोगवटादार यांनी स्वत:हून काढून घेतले आहे. इतर 20 पत्राशेडवर अंदाजे क्षेत्रफळ 25000 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग 'ड' प्रभाग यांचे पथकाने केली. दोन जेसीबी, एक डंपर, एक गॅस कटर तसेच दहा मजूर, सहा महापालिका अधिकारी आणि दहा पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top