Saturday, 14 Dec, 7.00 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri : दुचाकी घेऊन पळून जाणारा चोरटा जेरबंद

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर जाहिरात पाहून दुचाकी घेण्याची इच्छा व्यक्त करत ती चालविण्याचा बहाणा करून पळून जाणार्‍या चोरट्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना चिंचवड येथील डबल ट्री हॉटेलसमोर बुधवारी दुपारी घडली.

सागर संजय सिंग (वय-21, रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम सुनील कोंथबिरे (वय-28, रा. इंदिरानगर, चिंचवड) याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी शुभम यांची केटीएम ड्यूक-200 ही दुचाकी विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून आरोपी सागरने शुभम यांच्याशी संपर्क साधून दुचाकी घेण्याची इच्छा व्यक्त केली. दुचाकी बघण्याच्या बहाण्याने शुभम यांना जोरदार धक्का देऊन आरोपी दुचाकी घेऊन पसार झाला. मात्र, पोलिसांनी आरोपीला त्वरीत अटक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top