Saturday, 14 Dec, 7.48 pm MPC News

टॉप न्यूज
Pimpri : खासदार काकडे यांनी जाहीर माफी मागावी - गणेश ढाकणे

एमपीसी न्यूज - माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी खासदार काकडे यांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशारा जय भगवान बाबा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. गणेश ढाकणे यांनी दिला.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी खासदार संजय काकडे यांनी अपशब्द वापरले त्याबद्दल त्यांचा शनिवारी (दि.14) पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघ पुणे, भगवान सेना पिंपरी चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, भगवान बाबा प्रतिष्ठान, ओबीसी संघर्ष समिती या संस्थांचे प्रतिनिधी व ओबीसी संघर्ष समितीचे आंनदा कुदळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भूजबळ, समन्वयक सुरेश गायकवाड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भगवान बाबा मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद मुंडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कायंदे, उद्धव सानप, हनुमंत घुगे, शिवाजी गिते, नाना खेडकर, महादेव मुसळे, विजय सानप, परमेश्वर दराडे, अरुण गिते, आनंदा खाडे, राजू सानप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ढाकणे म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे हे आमचे दैवत आहे. त्यांच्या राजकीय वारसदार माजी मंत्री लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्याविषयी टिका टिपण्णी करणा-यांनी, अपशब्द वापरणा-यांनी पहिले आत्मपरीक्षण करावे. खासदार संजय काकडे हे प्रथम बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांनी उद्योग व्यवसायावर बोलावे. ते जरी भाजपचे सहयोगी सदस्य असले तरी भाजपच्या अंतर्गत कार्यप्रणालीवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही.

'खासदार संजय काकडे यांचे करायचे काय खाली डोके वर पाय', 'संजय काकडे, माफी मागा, माफी, मागा,', संजय काकडे मुर्दाबाद, मुर्दाबाद' अशा निषेधाच्या घोषणा उपस्थितांनी देऊन खासदार काकडे यांचा निषेध केला. आनंदा कुदळे, विनोद मुंडे, अरुण पवार, चंद्रशेखर भूजबळ, दत्ता कायंदे यांनी देखील खासदार काकडे यांचा निषेध करणारे भाषण केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top