Saturday, 14 Dec, 10.00 pm MPC News

पिंपरी चिंचवड
Pimpri : लोकअदालतीतून महापालिका तिजोरीत एका दिवसात 11 कोटी मालमत्ता कराचा भरणा

एमपीसी न्यूज - थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये 1 हजार 450 मालमत्ताधारकांनी 11 कोटी 50 लाख रुपये मिळकत कराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक थेरगाव दोन कोटी 23 लाख, भोसरी एक कोटी 73 लाख आणि चिखली कार्यालयातून एक कोटी 45 लाखांचा भरणा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशासनुसार आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे मार्गी लावली जातात. मालमत्ता कर, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणाचा न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो. त्यानुसार आज (शनिवारी) आकुर्डीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोकअदालत घेण्यात आली. यावेळी न्यायाधीश शुभांगी बी देसाई, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, स्मिता झगडे उपस्थित होते.

लोकअदालतीमध्ये 1 हजार 450 मालमत्ताधारकांनी 11 कोटी 50 लाख रुपये मिळकत कराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक थेरगाव दोन कोटी 23 लाख, भोसरी एक कोटी 73 लाख आणि चिखली कार्यालयातून एक कोटी 45 लाखांचा भरणा झाला आहे. एकाच दिवसात महापालिका तिजोरीत 11 कोटी 50 लाख रुपयांचा भरणा झाला आहे.

या लोकअदालतमध्ये थकबाकीसह संपूर्ण मिळकतकराची एक रकमी 100 टक्के रक्कम भरल्यानंतर भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या महापालिका कराच्या विलंब दंड रकमेत 90 टक्के सवलत देण्यात आली. तर, थकबाकीसह संपूर्ण मिळकत कराची एक रकमी 50 टक्के रक्कम भरल्यानंतर भरणा दिनांकापर्यंत आकारण्यात आलेल्या महापालिका विलंब दंड रक्कमेचे 45 टक्के सवलत देण्यात आली होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top