Thursday, 01 Oct, 9.48 pm MPC News

टॉप न्यूज
Pimpri news: काँग्रेस कार्यकर्त्यांकडून योगी आदित्यनाथांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशातील अत्याचारी हत्याकांडात बळी पडलेल्या पीडितेच्या घरी जात असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहूल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारकडून रस्त्यावरच अडवले गेले. राहूल गांधींना धक्काबूक्की करण्यात आली. या घटनेचा काँग्रेसकडून राज्यभर निषेध करण्यात येत आहे. पिंपरीतही संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (गुरुवारी) सायंकाळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले व निषेध सभेद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला.

'राहूल गांधी संघर्ष करो हम आपके साथ है', 'काँग्रेस पक्षाचा विजय असो', 'योगी हमसे डरता है पुलिस को आगे करता है', 'भाजपा सरकार मुर्दाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

कामगार नेते व इंटकचे जिल्हा अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डाॅ. वसिम ईनामदार, अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top