Saturday, 24 Aug, 11.07 am MPC News

होम पेज
Pimpri : शहरात दहीहंडी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - गोविंदा आला रे आला….मच गया शोर सार नगरी रे…तुझ्या घरात नाही पाणी, गोविंदा रे गोपाळा अशा गाण्यांवर थिरकत आणि डिझेच्या तालावर नाचत आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, यंदा शहरातील विविध मंडळांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत सामाजिक भानही राखले.

भोसरी, च-होली, चिंचवडगाव, दापोडी, पिंपरी, पिंपळेगुरव, सांगवीसह शहराच्या विविध भागात दहीहंडी उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सव मंडळांनी गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षिसे ठेवली होती. गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी शहरातील काही मंडळांनीच यावर्षी सिनेतारकांना आणले होते. दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळाले.

रात्री सातच्यानंतर दहीहंडीमध्ये खर्‍या अर्थाने रंगत आली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक दहीहंडी पाहण्यास घराबाहेर पडले होते. 'गोविंदा आला रे आला' या आवाजाचा जल्लोष करीत उंच-उंच मनोरे रचून गोविंदांनी दहीहंड्या फोडल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MPC News
Top